खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयात कोतवालांसाठी सोमवारी आरक्षण सोडत.
पत्रकार प्रमोद देवाडीगा ( महाराष्ट्र राज्याध्यक्ष ):-9623714741

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रमोद देवाडीगा ( महाराष्ट्र राज्याध्यक्ष )
खटाव तालुक्यातील वडूज येथील तहसील कार्यालयात कोतवालांसाठी सोमवारी आरक्षण सोडत.
खटाव तालुक्यातील ११ कोतवालांच्या भरती संबंधीची आरक्षण सोडत निवड समितीच्या उपस्थितीत वडूज येथील तहसील कार्यालयात १७ जुलैला सोमवारी दुपारी तीन वाजता करण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार प्रशांत जाधव यांनी दिली.
तरी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्ह्यातील कोतवालांच्या रिक्त पदांच्या ८० टक्के मर्यादेत पदे भरण्याचा सुधारीत कार्यक्रम देण्यात आला आहे. त्यानुसार खटाव तालुक्यात एकूण ५३ सजे मंजूर असून त्यापैकी ४२ कोतवाल पदे कार्यरत आहेत. तर उर्वरीत डिस्कळ, सिद्धेश्वर कुरोली, गोपूज, खातगुण, औंध, येळीव, भोसरे, म्हासुर्णे, बोंबाळे, नांदोशी, चोराडे या ११ कोतवाल पदांची आरक्षण सोडत सोमवारी काढण्यात येणार आहे. तरी संबंधित सजातील ग्रामस्थांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार प्रशांत जाधव यांनी केले आहे.