धुळे:-छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित केरळ शिवराजने २२० दिवसांत केले २४७ किल्ले सर; शिरपूर सायकलिस्ट ग्रुप कडून केले स्वागत:
संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
धुळे:-छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित केरळ शिवराजने २२० दिवसांत केले २४७ किल्ले सर; शिरपूर सायकलिस्ट ग्रुप कडून केले स्वागत:
काही लोक ध्येयवेडे असतात. त्यांनी एखादे ध्येय निश्चित केले की ते साध्य करण्यासाठी अक्षरश: स्वतःला झोकून देतात. त्यांचाच प्रत्यय शिरपूर येथे पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य आणि कर्तृत्वाचा इतिहासावर प्रभावित आणि महाराष्ट्रातील ३७० किल्ले सर करण्याची जिद्द उराशी बाळगून असलेला केरळ राज्यातील शिवराज गायकवाड वय २७ हा तरुण सायकलीने महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांची सर तो गेल्या १४ महिन्यापासून करत आहे. आत्तापर्यंत त्याचे ४२० दिवसात २४७ किल्ले बघितले गेले आहेत. त्याला पुढील प्रवासासाठी ग्रुप मधील सदस्य नानासो. निशांत रंधे, डॉ. अतुलभाऊ बडगुजर, योगेश भाऊ भंडारी तसेच ग्रुप मधील सर्व सदस्यांनी त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आरसी पटेल सीनियर कॉलेज येथे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील आणि प्रा. डॉ. भारत पाटील मार्गदर्शनाने शिवराज गायकवाड यांचे व्याख्यान ठेवण्यात आले. यासाठी सूत्रसंचालन प्रा. डॉ. रमाकांत चौधरी यांनी केले. शिरपूर सायकलिस्ट ग्रुप मधील सदस्य डॉ. अमोल जैन, डॉ. विजय अग्रवाल, वासुदेव शेलकर, प्रेमानंद महाजन, महेश सोनवणे, परमानंद रघुवंशी, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी आधी उपस्थित होते.