पारनेर विसापूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा – सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष – खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा-राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष सोनाली ताई कुलथे.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पारनेर विसापूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा – सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष – खड्डे लवकरात लवकर दुरुस्त करा-राष्ट्रवादी युवती कार्याध्यक्ष सोनाली ताई कुलथे.

प्रतिनिधी:-राजकुमार इकडे
पारनेर तालुक्यातील पारनेर विसापूर रोड हा गणपती फाटा ते म्हसणे फाट्यापर्यंत अतिशय खड्डेंमय झालेला असून मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले आहे
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभाग ब्र शब्द काढायला तयार नाही.
पारनेर तालुक्यात प्रशासकीय अधिकारी मनमानी पद्धतीने काम करत आहेत हे यातून स्पष्ट होत आहे. पारनेर विसापूर रोडवर म्हसने फाटा एम आय डी सी मुळे कामगारांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते तसेच पारनेर हे तालुक्याचं ठिकाण असल्या कारणाने शाळा कॉलेज तसेच तहसील कचेरी मुळे प्रवासी मोठ्या प्रमाणात वाहतूक करत असतात या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे अपघात होऊन अपंगत्व आले आहेत तरी या रस्त्यांची लवकरात लवकर दुरुस्त करावे असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) पारनेर तालुका युवती कार्याध्यक्ष सोनाली ताई कुलथे यांनी निवेदनात म्हटले आहे.




