क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

मुंबई:-राष्ट्रीय खो-खो पटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती!

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

राष्ट्रीय खो-खो पटू सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेत प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती!

मुंबई, (प्रतिनिधी ): राष्ट्रीय खो-खो पटू तथा क्रीडा प्रसारक श्री. सुनिल लाड यांची मुंबई महानगरपालिकेच्या दुकाने व आस्थापना विभागाचे प्रमुख अधिकारी (प्र) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. लाड हे डॉ. शिरोडकर हायस्कूल व महर्षी दयानंद कॉलेजचे विद्यार्थी असून, युवक क्रीडा मंडळ, परळ या संघातर्फे त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. आंतरविद्यापीठीय स्पर्धांमध्ये त्यांनी १९८६ ते १९८९ या कालावधीत सलग चार वेळा मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल करत त्यांनी बी.कॉम., एम.ए. व एल.एल.एम. अशी उच्चशिक्षणाची पदवी संपादन केली आहे. कोकण व मुंबईतील विविध शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध असून सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.

दुकाने व आस्थापना विभागात कार्यरत असताना त्यांनी प्रतिबंधित प्लास्टिकच्या वापराविरोधात प्रभावी जनजागृती केली. यासाठी त्यांनी अनेक शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था तसेच व्यापारी संघटनांच्या सहकार्याने नागरिकांमध्ये पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे पटवून दिले. कोविड-१९ महामारीच्या काळात त्यांनी बजावलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत, मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला होता. त्यांच्या या नियुक्तीबद्दल विविध क्षेत्रांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

जनसंपर्क : राम कोंडीलकर मो:-९८२१४९८६५८

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button