ताज्या घडामोडी

साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला आली त्रिमूर्ती मुळे झळाळी….

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

साताऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला आली त्रिमूर्ती मुळे झळाळी….

सातारा दि: महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महायुतीच्या माध्यमातून विकास कामाचे जाळे विणले आहे. मुख्यमंत्री शंभर दिवस विशेष कार्यक्रमांतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग सातारा जिल्हा पूर्व कार्यालयाने स्वच्छता मोहीम हाती घेतली. बांधकामच्या त्रिमूर्तीच्या सूचनेप्रमाणे व अधीक्षक अभियंता यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाला नंबर दिवसाच्या कार्यक्रमात शंभर टक्के स्वच्छतेची झळाळी आणली आहे.
सातारा जिल्ह्यामध्ये महायुतीने निर्विवाद लोकसभा व विधानसभेमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या विकास कामांचाही सिंहाचा वाटा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार या त्रिमूर्तीच्या समन्वयाने महाराष्ट्रात काम होत असतानाच साताऱ्यातील सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी सुद्धा अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व विभागाचे त्रिमूर्ती म्हणजे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे व उपकार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे आणि आकाश पाटील यांच्या सूचनेप्रमाणे कार्यालयाच्या परिसरात स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबवली आहे.
परिसरातील गाजर गवत व कचरा नष्ट करून रस्त्याची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने साताऱ्यातील बांधकाम विभाग म्हणजे शासकीय कार्यालय नसून एका धार्मिक स्थळासारखे त्याचे देखणी रूप दिसू लागलेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या विविध रंगाचे सुगंधी फुले व हिरवाई निर्माण करणारा बगीचा आणि संपूर्ण पूर्व विभागाचे कामकाज पाहणारा रेकॉर्ड रूम याची सुद्धा नीटनेटकी मांडणी करताना प्राचीन कागदपत्रांचे डिजिटलायझेशन आणि क्रमवारीनुसार त्याची मांडणी केल्यामुळे आवश्यक कागद पाच मिनिटात हाताला लागत आहे . जादूची कांडी फिरल्यासारखा सार्वजनिक बांधकाम विभाग चमकू लागलेला आहे. यामुळे कामांमध्ये गती निर्माण झालेले आहे. आवश्यक असणारी फाईल ताबडतोब हाती लागत असल्याने कर्मचाऱ्यांना सुद्धा काम करण्यामध्ये उत्साह वाढत आहे.
शंभर दिवसाच्या कालावधीमधील शंभर नंबरी स्वच्छतेची झळाळी दाखवण्याचा पराक्रम सार्वजनिक बांधकाम विभागाने केल्यामुळे त्या ठिकाणी भेटीसाठी आलेले अनेक ठेकेदार व इतर विभागाचे अधिकारी यांना सुद्धा नवल वाटत आहे.
एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ या वाक्याप्रमाणे सर्वजण एकमेकांना सहकार्य करत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील अनेक मान्यवर येतात. त्यांना आता एखाद्या प्रार्थनास्थळी आल्यासारखं मनाला उत्साह दिसून येत आहे. स्वच्छता पाहून अनेकांना एखाद्या कार्पोरेट कार्यालयात आल्याचा भास निर्माण होत आहे.
मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम जरी आखला असला तरी त्यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने स्वच्छतेचा संदेश तंतोतंत पाळलेला आहे. एवढेच नव्हे तर व्यसनमुक्तीसाठी काहींना प्रोत्साहित केले जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या उपक्रमाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, ग्राम विकास व पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे पर्यटन व मदत मंत्री नामदार मकरंद पाटील आणि सातारचे जिल्हाधिकारी श्री संतोष पाटील, पोलीस अधीक्षक समीर शेख, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यशानी नागराजन यांच्यासह अनेक मान्यवरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने राबवलेल्या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले आहे. बांधकाम विभागाच्या प्रवेशद्वारावर वृक्षारोपण आणि डोळ्याला हिरवळ दिसत आहे. भविष्यात या शंभर दिवसाची वाटचाल पुढील पाच वर्षापर्यंत टिकवण्याचाही प्रयत्न केला जाणार असल्याचे मनोगत अनेकांनी व्यक्त केले……………. .. …………………..

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

फोटो– सार्वजनिक बांधकाम विभागाचे रेकॉर्ड रूमची हस्तविकपणे पाहणी करताना त्रिमूर्ती अधिकारी (छाया– निनाद जगताप सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button