सातारा येथील नागठाणे गावचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी यात्रा उत्सव।।…………..
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार महेश मोहिते सातारा तालुका क्राईम रिपोर्टर
RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
सातारा येथील नागठाणे गावचे ग्रामदैवत श्री चौंडेश्वरी यात्रा उत्सव।।…………..
सातारा :-सातारा शहरापासून अवघ्या 16 किलोमीटर अंतरावर असलेले व पवित्र उरमोडी नदीच्या काठावर वसलेल्या नागठाणे गावाला समृद्ध असा सांस्कृतिक अध्यात्मिक सामाजिक असा वारसा लाभला आहे. 15 ते 20 हजार लोकसंख्येच्या या गावात विविध समाजातील लोक एकत्र राहतात व या सर्वांवर कृपा छत्र धरणारी व नागठाणे सह परिसरातील लोकांची आराध्य देवता असलेल्या माता चौंडेश्वरी देवस्थान अत्यंत जागृत आहे. तसेच नवसाला पावणारी देवी आहे.व देवस्थानला क वर्ग प्राप्त झाला आहे. श्री चौंडेश्वरी मातेचे मूळस्थान हे कर्नाटक राज्यातील बदामी आहे. साधारण 1856 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला होता. त्यामध्ये वरच्या आळीचे पाटील, खालच्या आळीचे पाटीलआणि देवीचे कारूकदार पालखीची सेवा करणारे मानकरी अशी मिळून देवस्थान ट्रस्ट स्थापन केली.
नागठाणे येथील देवीच्या दर्शनासाठी भाविक संपूर्ण महाराष्ट्रातून दर्शनासाठी येतात त्यांच्यामार्फत देवीची पालखीचे व देवीच्या देखभालीची जबाबदारी पार पाडली जाते. तीच प्रथा आज अखेर चालू आहे यासाठी सर्व ग्रामस्थ मिळून सहभाग करत असतात.
श्री चौंडेश्वरी देवी ची वार्षिक यात्रा बुधवार दिनांक:-23/04/ 2025 रोजी साजरी करण्यात आली यात्रेचे नियोजन खूपच सूंदर असे केले होते …..
🌺● बुधवार पहाटे 3 वाजता पाटलांच्या हस्ते रुद्र अभिषेक व महाआरती होईल.
🌺● सकाळी 8 वाजता बोरगाव येथील श्री चौंडेश्वरी देवी च्या बहिणीची गाठ घेण्यासाठी व श्री बोरजाई कारजाई देवीची ओठी भरण्यासाठी ( यात्रेसाठी निमंत्रण) पाटील व गुरव मानाची परडी घेऊन जातात.
🌺● दुपारी 12 वाजता देवीला पाटलांचा नैवेद्य व आंबील घुगऱ्या वाजत गाजत आणल्या जातात व तसेच पाच वाड्यातील मानाच्या सासनकाठ्या वाजत-गाजत येतात.
🌺● सायंकाळी 4 वाजता देवीच्या पालखीबरोबर असणारे पालखीला खांदा देणारे मानकरी, गुरव, पाटील, स्वामी, ब्राह्मण,दोन दिवटी धरणारे(पवार),बोडरे, ढोल वाजवणारे, छत्रीवाले (भोसले), माळी यांची फुलांची छत्री, हलगी वाजवणारे (मोहिते), सनईवाले, चवरी धरणारे (नलवडे), रुमाल फिरवणारे(कोकाटे), चांदीची काठी व पालखीसमोर नवस बोलणारे भक्त दिवटी धरून उभे असतात व देवीची मानाची सासन काठी असते व गावांमधील ग्रामस्थ व भक्तमंडळी यांच्या उपस्थितीत 🙏 “अंबाबाईच्या नावानं चांगभलं”, “चांगभलं म्हणा चांगभलं”. 🙏या गजरात देवीचा शाही पालखी (छबिना) सोहळा सुरू होतो.
🌺● पालखी (छबिना) सुरू झाल्यावर देवी गावातल्या मंदिरापासून माळावरील मंदिराकडे प्रस्थान व सायंकाळी 6:30 ला आई साहेबांचा माळावरील मंदिरात आगमन तिथे (देवीची भेट विधीवत आरती व विश्रांती).
🌺● सायंकाळी 7 वाजता गावातील मंदिराकडे पालखी (छबीना) सोहळा प्रस्थान.
🌺● रात्री 10 वाजता शाही पालखी (छबिना) मंदिरात विश्रांतीस दाखल.
🌺● रात्री 11 वाजता बोरगाव येथील आई बोरजाई कारजाई देवीच्या मानाच्या सासन काठ्या वाजत गाजत आई चौंडेश्वरी देवीच्या भेटीसाठी मंदिरापुढे दाखल.
🌺● रात्री 12 वाजता आई चौंडेश्वरी साहेबांची शाही पालखी (छबिना) आई बोरजाई कारजाई देवीच्या मानाच्या सासन काठीला भेट देण्यासाठी मंदिरातून पालखी मार्गावर प्रस्थान.
🌺● भेट झाल्यावर नंतर रात्रीचा छबिना सुरु.
🌺● रात्री 2 वाजता आईसाहेबांचा (छबिना) पालखी पारावर (कासाराच्या घरा समोर) विश्रांतीस दाखल. (विश्रांती वेळ 2ते 4)
🌺● रात्री 2 ते 4 वाजता लोकनाट्य तमाशा.
🌺● पहाटे 4 वाजता नदीवरून पाणी वाजत गाजत ( वाडकरी यांच्या हस्ते पाण्याची कळशी ) शाही पालखी कडे प्रस्थान. नंतर पहाटे 5 वाजता आई साहेबांच्या डोळ्यावर व पायावर पाणी घालणे.
🌺● पहाटे 5 वाजता आईसाहेबाचा पहाटेचा शाही छबिना सुरू ते सूर्योदय ला पालखी (छबिना) मंदिरामध्ये प्रवेश व महाआरती व पालखी सोहळ्याची सांगता….व दुसऱ्या दिवशी आई साहेबाचा भव्य असा भंडारा (प्रसादाचा )संपूर्ण लाभ गावाला होतो.