वडूज:-राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात वडूज ग्रामीण रुग्णालयाचे कार्य गौरवास्पद -डॉ. पारस कोठारी.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात वडूज ग्रामीण रुग्णालयातचे कार्य गौरवास्पद -डॉ. पारस कोठारी.
वडूज दि:
शालेय आरोग्य तपासणी दरम्यान ० ते १८ वयोगटातील दोषी मुलांच्या शस्त्रक्रियाचे शिबिर खटाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, वडूज याठिकाणी पार पडले. सदर शिबिरामध्ये ६० मुलांच्या वर ६३ यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
या शिबिरासाठी सायन हॉस्पिटल मुंबई येथील पेडियाट्रीक सर्जरी डिपार्टमेंटचे हेड व प्रोफेसर डॉ. श्री पारस कोठारी, असिस्टंट प्रोफेसर डॉ. श्री शहाजी देशमुख, पेडीयाट्रिक सर्जन डॉ. मैत्रेयी सावे, डॉ. द्रविना शेट्टी, भूलतज्ञ डॉ. श्वेता वाजे, डॉ. आकृती प्रभू, सीनियर स्टाफ नर्स सौ.विदुला मजली, व्यवस्थापक सौ. कुमुद मॅडम यांचे पथकाने या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या. या शस्त्रक्रियांमध्ये हर्निया, हायड्रोसिल, अनडिसेंटेड टेस्टीस, टंग टाय, फाय मोसिस, शरीरावर असणाऱ्या गाठी यांचा समावेश आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिबिर घेण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच वेळ असून ह्या शिबिरा बाबत पालक वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
या शिबिरासाठी आर बी एस के पथकातील डॉ. संतोष मोरे, डॉ. सम्राट भादुले, डॉ. प्रवीणकुमार तोरणे ,डॉ. अनिकेत पवार, डॉ. किरण फडतरे, डॉ. मनोज कुंभार, डॉ. निकाळजे, डॉ. स्वप्नजा देशपांडे, डॉ. रूपाली मुळे, डॉ. स्नेहा जनकर, डॉ. करिष्मा बागवान, ग्रामीण रुग्णालय वडूज येथील श्री वाघ व श्री फडतरे यांनी परिश्रम घेतले.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनवणे, सर्जन डॉ. राहुल जाधव,डॉ. रश्मी कुलकर्णी , ग्रामीण रुग्णालय वडूज चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. समीर तांबोळी, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षिका श्रीमती असिया पट्टणकुडे ,सातारा सिव्हिल हॉस्पिटलचे जिल्हा प्रशासन, ग्रामीण रुग्णालय वडूज येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.
चौकट…. वडूज ग्रामीण रुग्णालय येथे माझ्या मुलीवर शस्त्रक्रिया झाली..एक रुपया खर्च आला नाही..ग्रामीण रुग्णालय वडूज व शालेय आरोग्य तपासणी अधिकारी व सायन हॉस्पिटल मुंबई ची टीम यांचा मी शतशः ऋणी आहे .असेच शिबिर राबवून गोर गरीब मुलांना न्याय देऊन त्यांचे आरोग्य सुदृढ करावे हीच विनंती गरीब पालक श्री. नंदकुमार गोरे यांनी केली आहे.
—-&——————————–&——-
फोटो – वडूज ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय शस्त्रक्रिया करताना डॉक्टर