सातारा:-पुणे विभागीय अधिस्वीकृत समितीवर ज्येष्ठ पत्रकार श्री पाटणे व जाधव यांच्या निवडीने जल्लोष.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
पुणे विभागीय अधिस्वीकृत समितीवर ज्येष्ठ पत्रकार श्री पाटणे व जाधव यांच्या निवडीने जल्लोष.
सातारा दि: पत्रकारितेच्या माध्यमातून आपल्या लेखणीतून सर्वसामान्य गोरगरीब, कष्टकरी ,शेतमजूर व गावकुसामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना अधि स्वीकृत पत्रिका मिळावी अशी मागणी होत होती. परंतु या निवड समितीवर सर्वसामान्य कुटुंबातील पत्रकार श्री हरीश पाटणे व चंद्रसेन जाधव या सातारा जिल्ह्यातील दोन सुपुत्रांची निवड झाल्याने सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांनी जल्लोष केला
मुळात शिक्षकी वृत्ती असल्यामुळे आयुष्यभर विद्यार्थी म्हणून काम करत असताना शिक्षण क्षेत्रामध्ये दमदार पाऊल टाकल्यानंतर पत्रकारितेमध्ये आलेल्या दैनिक पुढारीचे हरीश पाटणे यांनी स्वबळावर ताकद निर्माण केली आपल्या ताकदीच्या जोरावर सध्या दैनिक पुढारी च्या सातारा आवृत्तीमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवताना सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष म्हणूनही कामकाज करत आहेत.
अनेक दैनिकांमध्ये भांडवलदार व संपादकांच्या मर्जीवर कामकाज चालत असताना बहुजन समाजाला न्याय देण्याचे काम दैनिकांनी केले आहे. च्या ही अभिमानास्पद बाब आहे. राज्य शासनाच्या समितीवर निवड करत असताना सातारा जिल्ह्याला ही स्थान मिळाले आहे .त्यामध्ये श्री बापूसाहेब जाधव यांच्या नंतर श्री चंद्रसेन जाधव यांची निवड झालेली आहे योगायोग आहे. यामुळे आता ग्रामीण भागातील पुणे विभागातील पत्रकारांना अधिस्वीकृत मिळवताना ज्या काही जाचक अटी व अडचणी निर्माण होतील त्या दूर होण्यास मदत होईल. अशी आशा व्यक्त होत आहोत.
सातारा जिल्ह्याचा विचार केला तर खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृत पत्रिका मिळावी म्हणून संपादक बापूसाहेब जाधव , संपादक घनश्याम छाबडा संपादक अनिल देसाई, संपादक शशिकांत पाटील त्याचबरोबर विविध साप्ताहिकाच्या संपादकांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने विविध दैनिकात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधी म्हणून तसेच स्वतंत्र्य व्यावसायिक पत्रकार श्रमिक पत्रकार ज्येष्ठ पत्रकार व त्यानंतर त्यांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत एकूणच या निवडीबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे त्याचे कारणही तसेच आहे संपादक, मालक, मुद्रक, प्रकाशक एवढ्या पुरतीच अधिस्वीकृत पत्रकार मर्यादित होती. त्याला व्यापक स्वरूप देण्याचे काम राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाने केल्यामुळे खऱ्या अर्थाने या पदाला न्याय मिळाला आहे. पूर्वी दैनिकाचे मालक व संपादक व त्यांचे नातेवाईक एवढ्यानाच पत्रिका मिळत होती. त्याबाबत आवाज उठवण्याचे काम समितीच्या सदस्यांनी केले यासाठी आवश्यक लागणारी सर्व कागदपत्र दिली. त्यामुळेच ग्रामीण भागातील पत्रकारांना न्याय मिळाला आता यापुढेही प्रस्थापित व्यवस्थेपेक्षाही सर्वसामान्य कुटुंबातील निर्भिड व निस्वार्थी तसेच पारदर्शकपणे पत्रकार त्या करणाऱ्या पत्रकारांना अधिकृत पत्रकार म्हणून निश्चितच निवड होईल असे ग्रामीण भागातील पत्रकारांनी मत व्यक्त केले तसेच समितीचे सदस्य श्री हरीश पाटणे व श्री चंद्रसेन जाधव यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
फोटो – हरिष पाटणे व चंद्रसेन जाधव