आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-कारवाईसाठी सातारा जिल्ह्यातील अपंगाला हव्यात अभिप्रायाच्या कुबड्या ?

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

कारवाईसाठी सातारा जिल्ह्यातील अपंगाला हव्यात अभिप्रायाच्या कुबड्या ?

सातारा दि:एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला तर सदरची व्यक्ती स्थानिक पोलीस ठाण्यात लेखी तक्रार करते. परंतु, या तक्रारीची सत्यता पडताळून गुन्हा दाखल करण्यात येतो.ती आवश्यक असणारी कागदपत्रे (कुबड्या) शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध होत नाहीत . त्यामुळे अभिप्रायाच्या कुबड्या मिळवण्यासाठी साताऱ्यात अपंग तरुणाची एकाकी झुंज द्यावी लागत आहे. याबाबत कागदी घोडे नाचून सर्वच यंत्रणा दिव्यांग झाल्याचे सामान्य माणूस टीका करू लागले आहेत.
याबाबत माहिती अशी की ,अतीत तालुका व जिल्हा सातारा येथील तरुण आशिष जाधव यांनी अशक्तपणा व इतर कारणामुळे सातारा तालुक्यातील शेंद्रे येथील एका नामांकित दवाखान्यात उपचार घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्याने उपचार घेतले परंतु ,चुकीच्या पद्धतीने उपचार झाल्यामुळे सदर तरुणाला अपंगत्व आले आहे. अशी त्यांनी लेखी तक्रार केली होती. सदर दवाखान्यातून रोख पैसे घेऊन उपचार करण्यात आले. परंतु, त्याला महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत पात्रता असूनही लाभ मिळाला नाही. अशी ही त्यांनी तक्रार केली होती.
सदरची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात अर्ज क्रमांक ७०/२०२३ दि:१०/१/२०२३ रोजी दाखल केल्यानंतर याबाबत सत्यता पडताळण्यासाठी सातारा तालुका पोलिसांनी दिनांक दि:२७ मे२०२३ रोजी जावक क्रमांक २७८३/२०२३ नुसार पुणे वैद्यकीय महाविद्यालयातील बी जे मेडिकल महाविद्यालय इथे सदर प्रकरणाबाबत तपास करण्यासाठी पत्रव्यवहार केला. या पत्राला जिल्हा शल्य चिकित्सक सातारा यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत जिल्हास्तरीय समितीची बैठक दि:२१ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी ४ वाजता झाली असून सदर समितीने प्राप्त कागदपत्राचे पडताळणी केली. सर्वानुमते सदर प्रकरणात विशेषत तज्ञांची गरज आवश्यक आहे असे नमूद करून पोलीस निरीक्षक, सातारा पोलीस ठाणे यांनी अधिष्ठता नायर रुग्णालय मुंबई अधिष्ठता कामा नये मुंबई अध्यक्ष वैद्यकीय महाविद्यालय तथा ससून सर्वोच्च रुग्णालय पुणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज छत्रपती प्रमिलाताई रुग्णालय, कोल्हापूर यापैकी कोणत्याही रुग्णालयात पत्र सादर करावेत. असे लेखी पत्र दिले होते.
त्या पत्रानुसार पत्रव्यवहार केला असता आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज यांनी दि:१८/०५/२०२३रोजी पत्र पाठवून
तसेच सदर न्यूरोलॉजिस्ट आणि मेडिकल अनुकॉलॉजी हे पद या संस्थेत उपलब्ध नसल्याने सदर प्रकरण बी जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे किंवा ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे यांच्याकडे चौकशी करा असेही नमूद केले आहे. त्यामुळे हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होत आहे.त्यामुळे तीस वर्षाचा तरुण आशिष जाधव हे आता न्यायासाठी झगडत आहे. त्याला अपंगत्व आले असून अपंगत्व दाखला देण्यात आला आहे.
सदर प्रकरणाबाबत नियुक्त विषयाच्या तद्या व्यतिरिक्त न्यूरोलॉजिस्ट अँड मेडिकल अँड कॉलॉजिस्ट याविषयी तज्ञांची गरज असल्याबाबत नमूद केले आहे तशा पद्धतीने बी जी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुणे किंवा ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई चौकशी करावी असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज यांनी पत्र दिले पत्र दिले . त्यामुळे अपंग तरुण आता न्यायासाठी व अभिप्रायाची कुबडी मिळावी यासाठी झटत आहेत. परंतु त्यांच्या विरोधातच संबंधित दवाखाना प्रशासन चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत असल्याचाही आरोप आशिष जाधव यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केला आहे.
या प्रकरणांमध्ये अपंग तरुणाची ससेहोलपट झाली असून त्याला कधी न्याय मिळेल? याची प्रत्यक्ष आहे. सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व जिल्ह्याचे मंत्री तसेच समर्थक हे राज्य शासनाच्या गतिमान कारभाराची जाहिरात बाजी करतात. परंतु, वस्तुस्थिती पाहता एका अपंग तरुणाला एका चुकीच्या पद्धतीने वागविले जात आहे.न्यायासाठी झटावे लागत आहेत तर दुसऱ्या बाजूला पोलीस ठाणे व संबंधित रुग्णालय कागदी घोडे नाचून या अपंग तरुणांना दुःखावर मीठ चोळत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत आता सदर अपंग तरुण अशीच जाधव याचे सहनशीलता संपले असून त्यांनी आता शेंद्रे तालुका व जिल्हा सातारा येथील दवाखान्यासमोर आत्महत्या करण्याचा इशारा दिला असल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, याबाबत संबधित यंत्रणेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण, उपलब्ध होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांची बाजू समजून घेता आली नाही.

_____________________________________
फोटो – उपचारांनंतर अपंगत्व आल्याचा आरोप करण्यात आलेला तरुण आशिष जाधव (छाया – अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button