ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव तालुक्यात मतदार यादी पुनर्बांधणी कार्यक्रम सर्वसमावेशक निर्णय घेण्याची मागणी.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

खटाव तालुक्यात मतदार यादी पुनर्बांधणी कार्यक्रम सर्वसमावेशक निर्णय घेण्याची मागणी.

वडूज दि: सातारा जिल्ह्यातील मतदार यादी पुनबांधणी कार्यक्रम संपूर्ण सातारा जिल्ह्यात सुरू झालेला आहे. या मतदार यादी पुनर्बांधणीसाठी सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधी समवेत महसूल यंत्रणा व निवडणूक शाखा कार्यरत आहे. या मतदार यादी पुनर्बांधणी कार्यक्रमांतर्गत सर्वच राजकीय पक्षाचा सहभाग असणे गरजेचे आहे .त्या अनुषंगाने खटावचे तहसीलदार यांनी सुद्धा सर्व राजकीय पक्ष पदाधिकाऱ्यांचा सहभागी करून घ्यावे. अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे खटाव तालुकाध्यक्ष कुणाल गडांकुश, राष्ट्रीय समाज पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीकांत देवकर व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष सादिक मुल्ला,विश्वास जगताप यांनी केले आहे.
दि:एक जानेवारी २०२४ ची दिनांक गृहीत धरून छायाचित्रासह मतदार यादी पुनर्बांधणी कार्यक्रम पूर्ण तयारी सुरू केलेली आहे .त्या अनुषंगाने खटाव तहसील कार्यालयात तहसीलदार प्रशांत जाधव यांच्या नेतृत्वाखाली तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष यांच्या प्रतिनिधी समवेत तहसीलदार जाधव यांनी बैठक घेऊन मार्गदर्शन केले. ही बाब सकारात्मक व चांगली असली तरी या बैठकीतून शिवसेना , शिंदे गट, राष्ट्रवादी एक गट ,एम . आय. एम., समाजवादी पक्ष, शेतकरी संघटना,मनसे ,रिपब्लिकन पक्ष (आठवले गट ), निकाळजे गट,वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष व सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडिया, लोक जनशक्ती पार्टी व इतर नोंदणीकृत पक्षाचे प्रतिनिधी नसल्याची चर्चा होत आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्षाची बैठक झाली असे समजणे उचित नाही. मनसे, रिपब्लिकन, शिवसेना, रा स प यांना पत्र पाठवून कळविण्यात आले असले तरी त्यांचे प्रतिनिधी नव्हते.
मतदार यादी अद्यावत करणे. कोणताही नागरिक मतदार यादी पासून वंचित राहू नये. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे कार्य करत असताना कागदी घोडे न नाचवतात प्रत्यक्षात महसूल यंत्रणेने नोंदणीकृत सर्वच राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना बैठकीला बोलवून सर्वसमावेशक निर्णय घ्यावा. अशी मागणी पुढे आलेली आहे. त्याचा विचार व्हावा अन्यथा काही पक्षाच्या प्रतिनिधी व कार्यकर्त्या समोरच खटाव तालुक्यात राष्ट्रीय मतदार यादी पुनर्बांधणीचा कार्यक्रम मार्गदर्शन करण्याऐवजी सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांचा समावेश करण्यात यावा. असे ही सूचित केले आहे. दरम्यान, याबाबत दुर्लक्षितपणा झाल्यास वरिष्ठ अधिकारी तसेच राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यांना निवेदन देण्यात येईल असे ही स्पष्ट करण्यात आले आहे.
————————————————-
फोटो – खटाव तालुक्यात राष्ट्रीय मतदार यादी पुनर्बांधणी कार्यक्रम निमित्त तहसिलदार व मान्यवर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button