कोरेगाव:-पिंपोडे बुद्रुक येथे शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी बायोफॅक्टर तंत्रज्ञानाची साथ.
पत्रकार अभिजीत लेभे सातारा:-9822883516

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अभिजीत लेभे सातारा
शेतकऱ्याच्या उत्पादन वाढीसाठी बायोफॅक्टर तंत्रज्ञानाची साथ.
पिंपोडे बुद्रुक
मौजे,सोळशी येथे बायोफॅक इनपुट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यावतीने श्री. जालिंदर सोळस्कर यांच्या शेतामध्ये प्रात्यक्षिक पीक पाहणी व चर्चासत्र कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये सोळशी, नायगाव,करंजखोप, नांदवळ, येथील सर्व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. वैभव पिसाळ यानी केली. त्यानंतर बायोफॅक्टर तंत्रज्ञानाची व उत्पदनांची संपूर्ण महिती रिजनल सेल्स मॅनेजर श्री. प्रशांत नाळे यांनी दिली. मातीचे आरोग्य व तिचे संगोपन हे पिकाचे उत्पन्न वाढवण्यासाठी किती उपयुक्त आहे हे नाळे सरांनी पटवून दिले यासाठी जीवम, फ्लोमिन व पोषक या नवीन खताची शृंखला ही उत्पादके खूप किफायतशीर आहेत त्या संबंधाची माहिती दिली. यानंतर या कंपनीच्या सर्व उत्पादकांचा प्रत्यक्ष पिकामध्ये कसा रिझल्ट आला हे जालिंदर सोळस्कर यांनी अनुभवातून सांगितले. माझा हा प्लॉट 20 एप्रिल ची लागण होती अतिरिक्त तापमान असल्याने पिकाची वाढ,फुटवे, फुळकळ्यांची संख्या खूप कमी होती कारण दिलेली खते पिकाला मानवत नव्हती म्हणून मी नवीन तंत्रज्ञानाच्या शोध घेऊन व नवनाथ नाळे या कंपनीचे प्रतिनिधींच्या सल्ल्याने मी हे सर्व उत्पादके वापरले त्यामुळे आज माझा प्लॉट खूप सक्षम आहे.आणि झाडांवरती माल पण खूप आहे आणि प्लॉट पण निरोगी आहे. मला 3000 ते 3500 हजार कॅरेट प्रति एकर मिळेल असा अंदाज आहे पूर्ण प्लॉटची अवस्था पाहता मी समाधानी आहे.
अधिक तापमान, बिघडलेली मातीची प्रत, जमिनीमध्ये कमी असलेली जीवाणूंची संख्या या सर्व कारणामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये उत्पन्न व खर्च ताळमेळ बसत नाही. पण मला आता खात्री पटली आहे बायोफॅक्टरच्या उच्चतंत्रज्ञानामुळे मला आता या सर्व बाबी वरती मात करून उच्चांक उत्पन्न घेणे शक्य झाले आहे असे प्रखर मत जालिंदर सोळस्कर यांनी व्यक्त केले.
बायोफॅक्टर कंपनीच्या या तंत्रज्ञानाचा सर्व शेतकरी बांधवांनी फायदा करून घ्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाची सांगता विशाखा लेंभे यांनी केली.