ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-मोळाचा ओढा ते शाहूपुरी शॉट कट रस्त्याने वाहनचालक खुश.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

मोळाचा ओढा ते शाहूपुरी शॉट कट रस्त्याने वाहनचालक खुश.

सातारा दि: सातारा शहरालगत असलेल्या नगरीला समतेचा नारा देणारे छत्रपती शाहू महाराज यांचे आठवण जतन करणाऱ्या शाहूपुरी हे निम शहराला साजेस नाव देण्यात आले आहे. परंतु नागरी सुविधांबाबत बजबजपुरी झाली असली तरी यंदाच्या पावसाळ्यापूर्वी मोळाचा ओढा ते शाहूपुरी शॉर्ट कट या रस्त्याचे नूतनीकरण केल्याने वाहन चालक जाम खुश झालेले आहेत. त्यांनी सुमारे 40 वर्षां नंतर रस्त्याबाबत नागरी सुविधांचा अनुभव घेत आहेत. याबाबत माहिती अशी की ,सातारा शहरालगत असलेल्या सातारा- वाई रस्त्या वरील मोळाचा ओढा हे प्रमुख स्थान आहे. या मोळाचा ओढा परिसरात नागरी वस्ती वाढलेली आहे .शाहूपुरी, गडकर आळी, आंबेदरे रोड , राजवाडा अशा ठिकाणी दीडशे ते दोनशे हाउसिंग सोसायटी तेवढ्याच विविध वसाहत असे त्याचे स्वरूप झाले आहे. त्याचबरोबर नजीक आजाद नगर, गंगासागर कॉलनी चिंतामणी सोसायटी ,गुलमोहर कॉलनी, अंजली कॉलनी, श्रीराम कॉलनी तसेच शाळा, महाविद्यालय आहे .या ठिकाणी दररोज किमान हजार- बाराशे वाहनांची ये जा होते. या रस्त्यामधून थेट शाहूपुरीला जाण्याचा शॉट कट मार्ग आहे .
पूर्वी शिंदे फर्निचर पासून आत मध्ये आल्यानंतर रस्त्यावर पडलेले खड्डे ,खाच खळगे ,उघड्यावरील गटार आदी अडथळ्यामुळे वाहन चालवताना दुचाकी चार चाकी वाहन चालकांना खूपच त्रास सहन करावा लागत होता. गेल्या ४० वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वसाहत व वाहनांची संख्या वाढलेली आहे. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते .परंतु, राजकीय इच्छाशक्तीच्या अभाव व श्रेयवाद यामुळे गेले ४० वर्ष हा रस्ता तांत्रिकदृष्ट्या होऊ शकला नाही.
काहींना सार्वजनिक जीवनात बदल आल्यानंतर हा रस्ता करणे गरजेचे वाटू लागले. त्यातून अनेक अडथळे दूर करत आता हा रस्ता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. सदरचा रस्ता उत्कृष्ट की निकृष्ट दर्जाचा आहे .याची चर्चा न करता रस्ता झाला याबद्दल संबंधितांना अनेकांनी धन्यवाद दिलेले आहेत. पूर्वी शिंदे फर्निचर च्या शेजारील रस्त्यातून आत आल्यानंतर मार्गक्रमण कसे करावे? असा प्रश्न पडला होता. पण, आता रस्ता चांगला झाल्याने वाहन चालकांना सुखद धक्का बसू लागलेला आहे .एखाद्या मोठ्या शहरातून मार्गक्रमण करताना जशा पद्धतीने चांगले रस्ते असतात अशा पद्धतीने हा रस्ता चांगला झालेला आहे.
या रस्त्यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले आहेत त्यांचा नाम उल्लेख टाळणे सध्या गरजेचे आहे. कारण, सातारा शहरात श्रेयवाद ही लागलेली कीड आहे. त्यामुळे कुणाला श्रेय देण्यापेक्षा काम झाले याचे समाधान येथील वाहन चालक व सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करत आहे. ज्यांनी खरोखर या रस्त्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांना या रस्त्याच्या वापर करणारे नागरिक धन्यवाद देत आहेत. विशेषता ॲड.धनंजय फरांदे, ॲड. विलास वहागावकर, समीर बागवान,अजित जगताप, माधव जाधव व अरविंद वांगडे , राजाराम शेलार, तुकाराम पवार, संजय शिंदे, अजित पवार, मनोज पवार व शांताराम शिंदे, गोरखनाथ जाधव आदी मान्यवरांनी धन्य वाद दिले आहेत.
या नवीन रस्त्याच्या कामासाठी ज्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.परिश्रम घेतलेले आहेत ते सर्व कौतुकास पात्र आहेत अशा शब्दात ज्येष्ठ नागरिक बा. ग. धनावडे, युवा कार्यकर्ते मनोज पवार व मान्यवरांनी त्यांच्या नागरिक सत्कार घेऊन त्यांचे कौतुक करावे अशी माफक अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच अधिकारी वर्गाने ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मोलाचे सहकार्य केले आहे. त्यांचेही आभार मानण्यात आले आहे. सदरच्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती चांगली व्हावी. यासाठी आता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
——————————————————–

छाया- मोळाचा ओढा शिंदे फर्निचर ते शाहूपुरी जाणाऱ्या रस्त्याच्या छायाचित्र (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button