खटाव:-कम्प्युटर इंजिनियर मा.श्री. रघुनाथ व अनिकेत माने यांच्याकडून म्हासुर्णे शाळेत लॅपटॉप व स्पीकर साहित्य भेट.
पत्रकार सागर पिसाळ खटाव:-7875411591

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक :- प्रल्हाद चव्हाण (8208717483)
पत्रकार सागर पिसाळ खटाव
श्री रघुनाथ माने व अनिकेत माने (Computer Engineer USA)
यांच्याकडून म्हासुर्णे शाळेस लॅपटॉप व स्पीकर साहित्य भेट….
म्हासुर्णे :: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा म्हासुर्णे येथे दिनांक 27 जून 2023 मंगळवार सकाळी 11 वाजता आपल्या म्हासुर्णे नगरीचे सुपुत्र श्री रघुनाथ आकाराम माने (कबड्डी संघटक) व त्यांचे चिरंजीव श्री अनिकेत रघुनाथ माने अमेरिकेत स्थायिक असलेले कॉम्प्युटर इंजिनियर यांच्या हस्ते शाळेस आधुनिक लॅपटॉप स्पीकर साहित्य शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षक वर्ग यांना सुपुर्द करण्यात आला.
वितरण सोहळ्यात लोक नियुक्त सरपंच सौ सोनाली महेश पवार आणि ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार श्री तुषार माने व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री शिवाजी चव्हाण उपाध्यक्ष रेवती माने सौ संध्या भरत माने सौ असीन जावेद मुल्ला व इतर सर्व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन सौ शकुंतला रघुनाथ माने यांच्या हस्ते व श्री अनिकेत माने यांनी श्रीफळ वाढवून केले प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री प्रताप पाटोळे यांनी केले श्री रघुनाथ माने यांनी मनोगत व्यक्त करताना या वर्षापासून इयत्ता पहिली ते चौथी विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक व तृतीय क्रमांक संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी व बक्षीस देऊन 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी गौरविण्यात येणार आहे असे जाहीर केले.
सौ सोनाली पवार, तुषार माने यांनी मनोगत व्यक्त केले सर्वात शेवटी श्री अनिकेत माने मनोगत व्यक्त करताना अमेरिकेतील शिक्षण व्यवस्था व भविष्यात वेगवेगळ्या स्वरूपात विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी प्रयत्नशील राहीन असे आश्वासन दिले. त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच सौ शकुंतला माने ह्यांनी मनोगत व्यक्त करताना मातृ-पितृ पूजन दिवसाची आठवण करून दिली विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत येताना आई-वडील यांच्या पाया पडून येणे त्यामुळे तुम्हाला त्यांच्या आशिर्वादाने जीवनात यशस्वी होण्यास प्रेरणा मिळेल. आभार प्रदर्शन व सर्व सूत्रसंचालन श्री निकम सर यांनी केले. सर्वांना पेढे व चॉकलेटचे वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली शाळेच्या शिक्षिका भारती माने भावना चव्हाण व कबीर खरमाटे उपस्थित होते.
प्रतिनिधी :: सागर पिसाळ (7875411591)