औरंगाबादः-रस्ताओलाडणाऱ्या वृद्घ महिलेस भरधाव दुचाकी स्वाराने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू.
प्रतिनिधी अमोल चव्हाण:-7397937231

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
औरंगाबादः-रस्ताओलाडणार्या वृद्घ महिलेस भरधाव दुचाकी स्वाराने धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन तीचा मृत्यु झाला. ही घटना औरंगाबाद जालना रोड वरील चिकलठाणा पोलिस चौकी समोर झाला.गुंजाबाई शंकर खाडे वय 75 रा.पासोड ता.औरंगाबाद असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे.गुंजाबाई या नातेवाईक महिले सोबत चिकलठाणा परिसरात आधार कार्ड अपडेट करण्यासाठी गेल्या होत्या.चिकलठाणा पोलिस चौकी समोर त्या रस्ता ओलाडंत असतांना त्या वेळी भरधाव वेगाने दुचाकी त्यांना येवुन धडकली व चालक घटना स्थळावरून पसार झाला.नातेवाईकांनी गुजांबाई याना गंभीर अवस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले परंतु उपचार सुरू असतांना त्यांची प्राण ज्योत माळवली.दरम्यान पोलिस सीसीटिव्ही च्या सहाय्याने फरार दुचाकी स्वाराचा शोघ घेत आहे.या प्रकरनी MIDC सिडको पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.