कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी:-पडळ–पाटीलवस्ती मुख्य रस्ता धोकादायक; तात्काळ दखल घेण्याची युवकांची मागणी.

ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION & RPS STAR NEWS NATIONAL PRESIDENT & EDITOR MR. PRALHAD CHAVAN – 8208717483

पडळ–पाटीलवस्ती मुख्य रस्ता धोकादायक; तात्काळ दखल घेण्याची युवकांची मागणी.

मायणी प्रतिनिधी –
पडळ ते पाटीलवस्ती, मधला वाडा आणि माळवे वस्ती यांना जोडणारा मुख्य रस्ता नूतनीकरणाच्या नावाखाली धोकादायक बनवण्यात आल्याची तक्रार पडळ येथील युवकांनी केली आहे. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून तो पूर्वीपेक्षा अधिक अरुंद करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गेल्या दोन महिन्यांत या रस्त्यावर गॅस सिलेंडर वाहतूक करणारी गाडी तसेच शाळकरी मुलांची वाहन पलटी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सुदैवाने या अपघातांत मोठी जीवितहानी टळली असली तरी भविष्यात गंभीर दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. “आजपर्यंत सुदैवाने जीवितहानी टळली, पण उद्या काही अनर्थ झाला तर जबाबदारी कोण घेणार?” असा सवाल युवकांनी उपस्थित केला आहे.
गावाच्या विकासासाठी येणारा निधी प्रत्यक्ष कामांवर खर्च होतो आहे का, की केवळ कागदोपत्री दाखवला जातो आहे, असा संशयही व्यक्त करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामावेळी दर्जा, मोजमाप आणि सुरक्षिततेचे निकष पाळले गेले का, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. काही जणांच्या फायद्यासाठी गावकऱ्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
तसेच गावात एकाच कंत्राटदाराला वारंवार कामे कशी दिली जातात, पात्र आणि अनुभवी कंत्राटदारांची कमतरता आहे का, ग्रामसेवक व संबंधित अधिकारी मौन का बाळगून आहेत, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कारखान्याचा कर आणि इतर निधी नेमका कुठे खर्च होतो, याचा खुलासा ग्रामसभेत तात्काळ करावा, अशी मागणी युवकांनी केली आहे.
रस्त्याचे तात्काळ रुंदीकरण, कामाची निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कारवाई झाली नाही, तर ग्रामस्थांना लोकशाही मार्गाने आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.

RPS STAR NEWS युट्युब चॅनेल ला लाईक, सबस्क्राईब आणि कंमेंट करा.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button