सातारा :-आंतरराष्ट्रीय योगा दिन सातारा कारागृहात बंद्यांसाठी साजरा.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
आंतरराष्ट्रीय योगा दिन सातारा कारागृहात बंद्यांसाठी साजरा.
सातारा दि:साताऱ्यातील समर्थ एज्युकेशन ट्रस्टच्या सावकार होमिओपॅथिक वैधकीय महाविद्यालय यांच्याकडे वैद्यकीय अधिकारी व विद्यार्थी यांच्यामार्फत सातारा जिल्हा कारागृहात बंद्यांसाठी योगासनाचे महत्त्व जाणून एकदिवसीय योगासन प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. तसेच आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
सातारा जिल्हा कारागृह येथे बंद्यांना आरोग्याची काळजी घेण्यासाठी व शरीर उत्तम ठेवण्यासाठी योगासनाचे महत्त्व सांगण्यात आले.योगासनाचे विविध प्रकार दाखवण्यात आले व त्यांच्याकडून करून घेण्यात आले. सदर महाविद्यालय च्या योगशिक्षिका डॉ. शितल इनामदार यांनी बंद्यांना मार्गदर्शन केले.. तसेच विद्यार्थी ऋतुजा जंगम व ऋषिकेश जंगम यांनी बंद्यांना योगासनाचे प्रकार करून दाखवले. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त घेण्यात आलेल्या एक दिवशी योग शिबिरामध्ये बंद्यांनी देखील योगासनाचे सर्व प्रकार स्वतः केले.
या शिबिरास सावकार होमिओपॅथिकचे डॉ. मकरंद वाळवेकर, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंगाधिकारी ज्ञानेश्वर दुबे, राजेंद्र भापकर, सुभेदार महेंद्र सोनवणे, शिपाई संजय यादव, प्रेमनाथ वाडीकर, अहमद संदे, चेतन शहाणे, चांद पटेल इत्यादी उपस्थित होते. या उपक्रमाचे अनेक मान्यवरांनी कौतुक केले.
———————————
सातारा कारागृहात योगा करताना बंद्या सोबत मान्यवर (छाया – अजित जगताप,सातारा)