ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोपरगांव वनिकरण खात्याचा प्रताप बिबट्याला खायला चपात्या…

पत्रकार प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:- 9767653309

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर

कोपरगांव वनिकरण खात्याचा प्रताप बिबट्याला खायला चपात्या…

लोणी इरीगेशन गेस्ट हाऊस शेजारी असलेल्या सामाजिक वनिकरण विभागाच्या नर्सरीत ठेवलेल्या पिंजर्‍यात हिस्र प्राणि बिबट्या दिसून आला.या पिंजर्‍याला कुलूप नव्हते तसेच पिंजर्‍याला सुरक्षेची कुठलीही यंत्रणा गार्ड वैगेरे आढळून आले नाही.तसेच शेजारी ५० फूट आंतरावर वस्ती शाळेतील मुले खेळत होती व नर्सरीत महिला काम करत असल्यामुळे लोणी पो.स्टेशनला दि.२२/६/२०२३ रोजी सकाळी ११ वा.कळविण्यात आले.पो.स्टे.कळविल्यानंत लोणी पोलीस स्टेशनचे सपोनि आठरे साहेब व त्यांचे कर्मचारी क्षेत्रीयस्थळी दाखल झाले.त्यांच्या पाहणीत सामाजिक वनिकरणाचे वनपरीक्षेत्र अधिकारी कार्यालयात नव्हते.तसेच कोपरगांव वन विभागाचे अधिकारीही नाॅट रिचेबल होते.सदर ठिकाणी कुलुप नसलेला पिंजर्‍यात बिबट्या जखमी अवस्थेत व भूकेने व्याकुळ अशक्त असल्याचे दिसून आले,त्याला खाण्यासाठी चपात्या टाकण्यात आल्या होत्या.

सामाजिक वनिकरण विभागाचे कर्मचारी आल्यावर त्यांना विचारणा केली असता हा बिबट्या या जागेवर ठेवण्यासाठी कोणताही पत्रव्यावहार झाला नसल्याचे सांगण्यात आले व त्याला कोणत्याही प्रकारे सुरक्षा तसेच त्याच्या भोजनाची व्यवस्था केली नसल्याचे सांगण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button