कराड:-19 महाराष्ट्र बटालियन NCC, कराड कडून जागतिक योग दिन साजरा.
पत्रकार प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा संतोष बोंगाळे कराड
19 महाराष्ट्र बटालियन NCC, कराड कडून
जागतिक योग दिन साजरा.
प्रतिवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिन 2023, 19 महाराष्ट्र बटालियन NCC, कराड च्या विविध शाळा, कनिष्ठ व वरीष्ठ महाविद्यांलयातील छात्रसैनिकांकडून नजिकच्या ऐतिहासिक स्थळांवर उत्साहात साजरा करण्यात आला.
सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील विविध शाळा, कॅालेज नी सदाशिवगड, आगाशिव लेण्या याठिकाणी
सांगली जिल्ह्यातील इस्लांपूर परिसरातील शाळा, कॅालेज नी राजारामबापू सैनिकी शाळा येथे
रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, दापोली सह अनेक शाळा, कॅालेज व कृषी विद्यापीठ यांनी जवळच्या समुद्र किना-यावर मोठ्या उत्साहात आंतरराष्ट्रीय योग दिन संपूर्ण प्रोटोकॅालनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली साजरा केला.
एकूण 12 कॅालेज व 28 शाळांनी सहभाग घेतला.
19 महाराष्ट्र बटालियन NCC, कराडचे कमांडींग अॅाफिसर कर्नल जे.पी.सत्यगीरी, कर्नल डी.के.झा यांचे संपूर्ण मार्गदर्शन लाभले.
बटालियन स्टाफ, NCC अॅाफिसर व सर्व छात्रसैनिकांचे अमूल्य सहकार्य लाभले.