नाशिक:-आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी आश्रम शाळांना प्रिंटर वाटप.
संपादक अरुण आहेर कोपरगाव:-9096664533

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
संपादक अरुण आहेर कोपरगाव
आमदार किशोर दराडे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत आदिवासी आश्रम शाळांना प्रिंटर वाटप.
आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत नाशिक जिल्ह्यातील सटाणा, कळवण या ठिकाणच्या माध्यमिक आश्रम शाळांना आमदार किशोर दराडे यांच्या निधीतून झेरॉक्ससह अद्यावत प्रिंटरचे वाटप करण्यात आले सटाणा येथील कपालेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ अनुदानित माध्यमिक आश्रम शाळा पठादेदिगर येथे हा कार्यक्रम पार पडला तर कळवण येथील मानूर येथे वाटपचा कार्यक्रम झाला आश्रम शाळेचे कामकाजामध्ये सुसूत्रता यावी कामे पत्रव्यवहार मार्गी लागावा यासाठी अद्यावत प्रिंटर आमदार किशोर दराडे यांनी स्वतः या ठिकाणी वाटप केले त्याचप्रमाणे आदिवासी आश्रम शाळेतील शिक्षकांच्या अनेक समस्या सोडवल्या असून वेळेसंबंधी अथवा इतर समस्या संबंधी सखोल चर्चा करून सर्व प्रश्न सोडवण्यात येतील असेही सांगितले यावेळी कळवण व सटाणा 18 शाळांना प्रिंटर वाटप प्रसंगी अविनाश सांगळे, प्रकाश सांगळे, बाळू सोनवणे, देवा पवार आदी व उपस्थित होते.