ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा-सातारचे पालकमंत्री ना. देसाई यांच्या आक्रमक भूमिकेला छुपा पाठिंबा.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

सातारचे पालकमंत्री ना . देसाई यांच्या आक्रमक भूमिकेला छुपा पाठिंबा.

सातारा दि: राज्याचे माजी गृहमंत्री व पोलादी पुरुष स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांचे नातू व विद्यमान सातारा जिल्हा पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी सातारा शहरातील पोवई नाक्यावरील नूतन आयलँड उभे करून त्याला स्व.बाळासाहेब देसाई यांचे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे .त्यांच्या या भूमिकेला साताऱ्यातूनच छुपा पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे.
याबाबत माहिती अशी की, सातारा शहरातील पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात युनायटेड वेस्टर्न बँकेने आयलँड उभे केले होते. त्याच धर्तीवर शिवतीर्थ वास्तूला कुठे धक्का न लावता स्वर्गीय बाळासाहेब देसाई आयलँड करण्याचा निर्णय पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांनी घेतला. या कामाला तातडीने मान्यता मिळवण्यात आली. सदरची बाब सोशल मीडियाच्या माध्यमातून उघड झाल्यानंतर श्री.छ. खा उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांनी तसेच चार दोन संघटनेनी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात कोणत्याही स्वरूपाचे आयलँड उभे करू नये. असे निवेदन दिले. त्यानंतर नामदार देसाई यांनी जिल्हा नियोजन भवनातील बैठकीला येण्यापूर्वी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन भवन परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना तसेच पत्रकारांना हुसकावून लावले. त्यानंतर जाहीर केलेल्या पत्रकार परिषदेपूर्वीच अर्धा तास अगोदर पोलीस बंदोबस्तात पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेमध्ये नामदार शंभूराजे चांगलेच आक्रमक झाले होते. काही दैनिकाचा उल्लेख करून त्यांनी या लोकशाहीच्या चौथा खांब पत्रकारांना काय छापायचे ते छापा? तुम्हाला निवेदन दाखविण्याची गरज काय?अशा शब्दात आपला राग व्यक्त केला. एवढेच नव्हे तर सातारच्या राजघराण्यातील मान्यवरांचे जर काही गैरसमज असतील तर स्वतः राजघराण्यातील कुटुंबाची समक्ष भेट घेऊन चर्चा करीन. आणि त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करीन.
सातारा शहरातील शिवतीर्थला कुठे धक्का लागणार नाही. शिवतीर्थाचा परिसर माझे आजोबा स्वर्गीय बाळासाहेब देसाई साहेब यांनी उभा केला आहे. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनीच बसवला आहे. छत्रपतींच्या घराण्याचा आम्ही आजपर्यंत आदरच केला आहे. यापुढेही आदर करीत राहू . असेही त्यांनी सांगितले . त्यांच्या या भूमिकेला पाठिंबा मिळत आहे.
स्व.बाळासाहेब देसाई आयलँड हे काम पावसाळ्यानंतर किंवा पावसाळा संपल्या नंतर केले जाईल .असे सांगून शिवतीर्थाचा उल्लेख मान्यता पत्रात कुठेच नाही. शिवतीर्थ हे नाव असल्याचे कोण ठरवणार? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तेवढाच भाग शिवतीर्थ आहे. मी माध्यमांना खुलासा देण्यास बांधील व जबाबदार नाही.
तुम्हाला काय छापायचे ते छापा? असे त्यांनी ठणकावून सांगितले . सातारा नियोजन भवन परिसरात प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार उपस्थित होते त्यांना पोलीस अधिकारी व पोलिसांनी अक्षरशः हुसकावून लावले हा झालेला अपमान ज्येष्ठ पत्रकार यांना सहन झाला नाही. त्यांनी पत्रकार परिषदेवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले . त्यानुसार सातारा शहरातील व परिसरातील निर्भीड व निस्वार्थीपणे काम करणारे व सामाजिक भान ठेवणाऱ्या पत्रकारांनी या पत्रकार परिषदेला बहिष्कार घालून पत्रकारांवर होणाऱ्या अन्यायाबाबत लक्ष वेधून घेतले. वास्तविक सातारा जिल्ह्यात अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. सध्या पंढरपूर मार्गावर वारकरी संप्रदाय दिंडी निघालेली आहे. या दिंडीच्या बाबत वारकऱ्यांवर सेवा पुरविणे तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये. शैक्षणिक वर्ष सुरू झाले असून विद्यार्थ्यांना वेळेत दाखले उपलब्ध होणे. पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी लागणारी बी बियाणे उपलब्ध करणे. अशा अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा होणे. अपेक्षित असताना जाणीवपूर्वक काही इश्यू उभा करून सातारकरांचा स्वयंघोषित प्रतिनिधी म्हणून काही जण वागत आहेत. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
सध्या पोवई नाका परिसरात वाईन शॉप, बियर बार व दारूचे दुकाने तसेच गुटखा विक्री करणारे टपऱ्या आहेत . मटक्याच्या सुद्धा टपऱ्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात परिसरात अतिक्रमण करून धन दांडग्यांनी हे अतिक्रमण पचवले सुद्धा आहे. याबाबत काही पोटार्थी सामाजिक कार्यकर्ते अथवा स्वतःला शिवप्रेमी म्हणणारे आवाज उठवत नाहीत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन हे नियोजित स्व .बाळासाहेब देसाई आयलँड होऊ द्यायचे नाही.जर तसा प्रयत्न केला असेल तर या कामाला मिळालेल्या मान्यतेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणे गरजेचे आहे. व्यापक प्रमाणात आंदोलन झाले पाहिजे.या कामाला स्थगिती देणे हा लोकशाहीचा एक भाग आहे. मात्र त्याबद्दल कोणी अद्याप दमदार पाऊल टाकले नाही. इतिहासामध्ये वेडात मराठे वीर दौडले सात,,,,, पण अलीकडे अनेक जण शहाणे असून सुद्धा मूळ प्रश्नाला डोळेझाक करून बगल देत आहेत . ध्रुतराष्ट्र प्रमाणे सोयीची भूमिका घेत आहे. अशी टीका होऊ लागली आहे. त्यातच साताऱ्यातील काही प्रसार माध्यम विरोधात नामदार शंभूराज देसाई उघडपणे समोरासमोर आले आहेत. त्यामुळे लोकशाहीचा चौथा खांब व लोकप्रतिनिधी हा सामना रंगले की मिटेल? याकडे ही लक्ष वेधून घेतले आहे.

————————————————————

फोटो -छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना स्वर्गीय बाळासाहेब देसाई व मान्यवर

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button