खटाव – वडगाव येथील जयराम स्वामींच्या पालखीचे 21 रोजी प्रस्थान.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
खटाव – वडगाव येथील जयराम स्वामींच्या पालखीचे 21 रोजी प्रस्थान.
मायणी प्रतिनिधी–पायी पंढरपूरला जाणाऱ्या जयराम स्वामी पालखीचे प्रस्थान आषाढ शुद्ध तृतीया 21 जून रोजी दुपारी दोन वाजता वडगाव जयराम स्वामी येथून होणार असल्याची माहिती चालक मठाधिपती जयराम स्वामी संस्थान हभप गुरुवर्य विठ्ठल स्वामी महाराजांनी दिली. अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की बुधवार 21 रोजी जयराम स्वामी मठ येथून पालखीचे प्रस्थान होईल व पहिला मुक्काम महासुरने येथे होईल गुरुवार दिनांक 22 रोजी दुपारचा नैवेद्य व भोजन झाल्यानंतर रात्री मुक्काम मायणी येथे होईल. तर शुक्रवार दिनांक 23 रोजी किशोर चोथे व डॉक्टर मकरंद तोरो यांच्याकडे पालखीचा मुक्काम झाल्यानंतर त्याचवेळी मेडिकल कॉलेज मार्फत रुग्णसेवा होईल व दुपारचे भोजन झाल्यानंतर विभूतवाडी येथे मुक्काम होईल. शनिवार दिनांक 24 रोजी विभूतवाडी येथे दुपारचा नैवेद्य व भोजन झाल्यानंतर शेनवडी येथे मुक्काम होईल 25 रोजी शेनवडी येथे दुपारचा नैवेद्य व भोजन झाल्यानंतर दिघंची येते दत्तात्रय कुलकर्णी व नामदेव ढोले संजय मोरे यांच्याकडे मुक्काम होईल सोमवार दिनांक 26 रोजी दिघंची येथे रमाकांत कुलकर्णी व भगवान मोरे यांच्याकडे नैवेद्य व भोजन झाल्यानंतर महूद येथे मुक्काम होईल. याचवेळी कटफळ येथील चंद्रकांत बुरुंगले यांच्या शेतात जयराम स्वामी पालखीचे गोल रिंगण होईल मंगळवार दिनांक 27 रोजी हनुमंत वसंत देशपांडे यांच्याकडे भोजन व नैवेद्य झाल्यानंतर गादेगाव येथे मुक्काम होईल बुधवार दिनांक 28 रोजी गादेगाव येथे भोजन व नैवेद्य झाल्यानंतर जयराम स्वामी मठ पंढरपूर येथे मुक्काम होईल. या दिंडी सोहळ्यात वडगाव शामगाव वांजोळी गोरेगाव पारगाव कडेपूर पुसे सावळी राजाचे कुरले उंबर्डे विहापूर मुंबईकर ग्रामस्थ पोकळेवाडी हिंगणगाव लाडेगाव डेरवण भजनी मंडळ लाडेगाव भजनी मंडळ जयराम स्वामी भजनी मंडळ थोरवेवाडी भजनी मंडळ सहभागी होणार आहे दिंडी सोहळ्यात चालत येणाऱ्या वारकऱ्यासच कीर्तन सेवा मिळेल पालखीचे नियोजन गुरुवर्य विठ्ठल स्वामी महाराज मठाधिपती यांनी केली आहे.