ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आष्टी :-उंदरखेल -उत्कर्ष मोरे हिचे सी.ए. परीक्षेत उज्वल यश.

प्रतिनिधी:- सिराज शेख आष्टी :-9405829012

* *उत्कर्षा मोरे हिचे सी.ए परीक्षेत उज्ज्वल यश.*

(ऊंदरखेल येथे नागरी सत्कार करण्यात आला.)

आष्टी/ प्रतिनिधी.
आष्टी तालुक्यातील उंदरखेल गावचे प्रगतशील शेतकरी श्री संभू हिराजी मोरे यांची नात कु उत्कर्षा संतराम मोरे ही आज सी.ए परीक्षा उत्तीर्ण झाली. उंदरखेल या गावी जन्मली, ज्या गावांमध्ये शिक्षणाची कुठली सोय नाही. अशावेळी आपले वारकरी आजी आजोबा आणि जि. प.प्रा शाळेचे मुख्याध्यापक असणारे वडील संतराम मोरे आई सौ .पदम यांच्याकडून संस्कार घेऊन उत्तम शिक्षण घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून आपले मामा संतोष गाडे यांच्याकडे नगर येथे सहावी पर्यंत शिक्षण घेतले नंतर तिने इयत्ता सातवी पासुन पुढे इंग्रजी माध्यमाच्या शाळेत प्रवेश घेतला आणि दहावी मध्ये घवघवीत यश संपादन करून ९३ टक्के मिळवून दुसरा क्रमांक मिळवला, अभ्यासात हुशार आणि आई वडीलांच्या कष्टाची जाणीव असणारी उत्कर्षा मोरे हिने पुढे बारावीमध्ये ऊत्तम परिश्रम घेऊन , बारावीमध्ये अहमदनगर जिल्ह्यात मुलीमधुन प्रथम क्रमांक मिळवून बारावीच्या परीक्षेत यश मिळवले ,ऊत्तम जाण आणि गणित विषयाची आवड तिला सी.ए होण्यासाठी खुणावत होती आणि येथेही सातत्याने प्रयत्न करून जिद्दीने अभ्यास करून ती सी.ए परीक्षा उत्तीर्ण झाली प्रसंगी उंदरखेल ग्रामस्थांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच श्री अंकुश वामन,उपसरपंच डॉ रमेश शेकडे, गटप्रमुख श्री हरिभाऊ दहातोंडे, माजी सभापती राजेंद्र दहातोंडे ,माजी सरपंच राजेंद्र दहातोंडे, अशोक दहातोंडे सर, श्री शरद वामन, श्री नितीन वामन ,श्री आजिनाथ वामन, दिगंबर शेकडे ,राजेंद्र शेकडे, पै योगेश वामन, श्री बाबासाहेब मोरे, गणेश मोरे, श्री आजिनाथ दहातोंडे, श्री लिंगदास वामन,श्री गणेश वामन, भगवान चव्हाण, काशिनाथ वामन, आत्माराम खांदवे,सुभाष पिंपळे, शिवाजी पाखरे, दादा वामन, राजेंद्र वामन सर, राजगुरू सर ,वसंत वामन ,शिवाजी वाघमारे ,सुरेश पाखरे, मारुती मोरे ,उद्धव मोरे , पत्रकार शेख अमजेद इत्यादी ग्रामस्थ उपस्थित राहून तिचे अभिनंदन केले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button