सातारा:-शिवसेनेतून दुरावलेले आ.शिंदे भाजप फलकावर सुद्धा आले जवळ…..
राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण – 8208717483

शिवसेनेतून दुरावलेले आ.शिंदे भाजप फलकावर सुद्धा आले जवळ…..

(अजित जगताप)
सातारा दि: छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा प्रवेश भूमी साताऱ्यात मोठ्या दिमाखात ग्रामविकास विभागाने लाभार्थी मेळावा व प्रधान मंत्री आवास अभियान राज्यस्तरीय पुरस्कार कार्यक्रम घेतला. शुक्रवार दिनांक १५ मे रोजी दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमाला शिवसेनेच्या फलकावरून दुरावलेले शिवसेनेचे कोरेगाव आ. महेश शिंदे यांची भाजपची जवळीक फलकावर दिसून आली. त्याची फारशी दखल सातारकरांनी घेतली नसल्याचे दिसून आले. एवढेच नव्हे तर शिवसेनेच्या कोरेगाव मतदार संघातील उमेदवाराची आतापासूनच शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. याबाबत माहिती अशी की, शिवसेनेचे दोन वेळा आमदार असलेले कोरेगावचे महेश शिंदे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे विधिमंडळात प्रतिनिधित्व करतात. तरीही त्यांचा सातारा जिल्ह्यात संपूर्ण कल हा भाजपला अनुकूल असाच राहतो. आता तर उघड पणाने त्यांनी भाजपचे समर्थन केले आहे. मी स्व बळावर निवडून येतो. मला कुणी त्रास देऊ नये. असे जाहीर आव्हान शिवसेनेला दिले आहे. मुळे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व शिवसेना उपनेते शंभूराज देसाई यांनी जाणीवपूर्वक कोरेगावचे सुपुत्र व उद्योजक राजाभाऊ बर्गे यांना शिवसेनेत प्रवेश दिला. त्यांना राजकीय ताकद दिल्यामुळे खऱ्या अर्थाने कोरेगावच्या विकासाला बळ मिळाले आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भरीव निधी दिला आहे. तरीही निधी देण्याचा अधिकार भाजप पक्षाचे मुख्यमंत्र्यांकडे आहे. असे सांगण्यास आ. शिंदे विसरले नाहीत. आगामी २०१९ साली होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत खऱ्या अर्थाने भाजपने कोरेगाव मतदार संघात शिवसेनेचे विद्यमान आ. महेश शिंदे यांना उमेदवारी दिल्यास नवल वाटणार नाही. महायुतीच्या माध्यमातून एक संघ असलेल्या राज्यातील मंत्रिमंडळात सर्व काही आलबेल आहे. परंतु ,सातारा जिल्ह्यात खऱ्या अर्थाने भाजप विरोधात शिवसेना अशीच लढत पाहण्यास मिळणार आहे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदी इतर मागासवर्गीय महिलांसाठी राखीव असताना दीड दिवसांमध्ये आमदार महेश शिंदे यांची पत्नी डॉ. प्रियाताई शिंदे यांना कुणबी दाखला देऊन भाजपने मूळ इतर मागासवर्गीय असलेल्या जिल्हा परिषद सदस्य महिलांवर अन्याय केला आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदी डॉ. प्रियाताई शिंदे यांना दिले. आता सध्या त्यांच्या जातीच्या दाखल्याच्या तक्रारीची सुनावणी सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका घेतलेले राज्याचे ग्रामविकास मंत्री व माण खटावचे भाजप आ. जयकुमार गोरे म्हणजे कुऱ्हाडीचा दांडा गोट्यास काळ असेच त्याचे वर्णन केले जात आहे. यामध्ये राजकीय आरोप असले तरी वस्तुस्थिती वेगळी नाही. शिवसेनेच्या अनेक पक्षीय बैठका व कार्यक्रमातून आ. महेश शिंदे यांना निमंत्रण दिले जात नाही. अशी खंत त्यांनी स्वतःच बोलून दाखवली आहे. परंतु त्यांचा सर्व कल हा भाजपशी निगडित आहे. हे त्यांनी कृतीतून सुद्धा दाखवून दिले आहे. सध्या शिवसेनेच्या फलकावरून आमदार शिंदे यांचे भाजपमधील इन भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांना विचार करण्यास लावणारे आहेत. तर शिवसेना पक्ष कधीच कोरेगावात वाढला नाही. अशा शब्दात आमदार शिंदे यांनी पालकमंत्री देसाई व त्यांच्यासोबत असणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना डिवचल आहे. सध्या भाजपच्या फलकावर आमदार महेश शिंदे यांची छबी म्हणजे खऱ्या अर्थाने शरीराने शिवसेना व मनाने भाजपमध्ये आपण असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे.



