वैजापूर पोलिस स्टेशन अंतर्गत प्रभारी अधिकारी यांच्या समक्ष पती पत्नी चा वाद महिला दक्षता विभागाच्या मध्यस्थीने संपुष्टात.
पत्रकार बाळासाहेब सरोदे छ.संभाजीनगर:9022552792

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार बाळासाहेब सरोदे छत्रपती संभाजीनगर
वैजापूर:-गेल्या 20 वर्षापासून चालू असलेला पारिवारिक पती-पत्नीचा वाद महिला दक्षता विभागाच्या मध्यस्थीने अखेर मिटला.अनेक जणांनी मध्यस्थी करून ही हा वाद मिटत नव्हता.
श्री पंडित मल्हारी महाले व सौ. पूजा पंडित महाले या दोघांचा अनेक दिवसांपासून पारिवारिक वाद सुरू होता. हे भांडणे पोलिस स्टेशन पर्यंत गेले होते. पण वेळीच महिला दक्षता विभागाच्या अलकाताई जेजुरकर व समिना शेख, व भारतीय जनता पार्टी चे अनिल पाटील वाणी,सामाजिक कार्यकर्ते विष्णू महाराज मेधने रोहित इंगळे गणेश गुंजाळ प्रविण सोनवणे यांच्या मध्यस्थीने अखेर मिटला. या प्रसंगी वैजापूर पोलिस स्टेशन चे प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संजय लोहोकरे यांनी दोघांनाही समजूत देऊन त्यांचा मार्ग मोकळा केला.