ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

वाई अर्बन बँक परिवारा चे उमेदवार जाहीर.

संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

संपादक प्रल्हाद चव्हाण

वाई अर्बन बँक परिवारा चे उमेदवार जाहीर.

दि 9 वाई प्रतिनिधी
वाई अर्बन बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी वाई अर्बन परिवार पॅनलच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा आज पॅनेल प्रमुख डाॅ सुधीर बोधे,अरुण देव, दिपक ओसवाल, प्रा किशोर अभ्यांकर व नरहरी महाबळेश्वरकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
या वेळी बोधे म्हणाले कोरोना मुळे बँकेच्या आर्थिक स्थिती वर परिणाम झाला आहे. रिझर्व बँकेचे निर्बंध आहेत. त्यामुळे सभासदांचे हित जोपासले जावे, व निवडणूक खर्चाचा नाहक बोजा बॅकेला पडू नये या साठी अर्बन परिवाराने वेदमुर्ती कै शंकरराव अभ्यंकर व कै पोपटलाल ओसवाल यांचा आर्थिक शिस्तीचा आदर्श जोपासत बॅकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार केला आहे
परंतु ईच्छुकांची संख्या अधिक होती त्यावर द ना पटवर्धन पॅनेल व व्यापारी महासंघ यांच्याशी चर्चा करून सर्व समावेशक पॅनेल तयार केले आहे याव्यतिरिक्त अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सहकार्य करावे
अर्बन परिवार पॅनलचे उमेदवार
सर्व साधारण गट अनिल देव, विवेक पटवर्धन, काशिनाथ शेलार, मकरंद मुळे, रमेश ओसवाल, बाळकृष्ण पंडीत, महेश राजेमहाडीक, माधव कान्हेरे,स्वप्नील जाधव, प्रितम भुतकर,
महिला राखीव: ज्योती गांधी, सुनिती गोवित्रिकर,
विमुक्त जाती /भटक्या जमाती /विषेश मागास प्रवर्गासाठी : चंद्रकांत गुजर
यांचा समावेश आहे
आज सर्वसाधारण गट व इतर मागास प्रवर्गातून यशवंत जमदाडे चंद्रशेखर ढवण तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातून सुधाकर वाईकर यांनी उमेदवारी मागे घेतल्यामुळे डाॅ. शेखर कांबळे व अशोक लोखंडे हे बिनविरोध निवडून आले असून इतर १३ जागांसाठी ४८ उमेदवार शिल्लक राहिले आहेत १३ तारीख उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम मुदती वेळी निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button