पारनेर:-पिंपरी- गवळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोफत मोतिबिंदू शिबिर संपन्न.
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पिंपरी- गवळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोफत मोतिबिंदू शिबिर संपन्न.

पारनेर(राजकुमार इकडे)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका उपाध्यक्ष श्री विरेंद्र थोरात यांच्या संकल्पनेतून व पुण्यातील सुप्रसिद्ध बुधराणी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत मोतीबिंदू निदान व नेत्र तपासणी शिबिर भैरवनाथ मंदिर पिंपरी गवळी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका प्रमुख अविनाश पवार साहेब यांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पिंपरी गवळी गावातील ज्येष्ठ नागरिकांसह वयो वृद्धांनी या शिबिरात सहभाग नोंदविला तालुका अध्यक्ष अविनाश पवार यांनी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील जेष्ठ नागरिकांना शिबिराच्या माध्यमातून आधार देण्यासाठी अशा प्रकारे पारनेर तालुक्यात उपक्रम राबविले जाणार आहे तसेच उपस्थित सर्वांनी मनसे चे तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात यांचे अभिनंदन केले यावेळी बबन थोरात, बाबासाहेब थोरात, विश्वनाथ मांडगे, मंगल थोरात, संजना थोरात, रंजना मांडगे, नामदेव वर्पे,शिला वर्पे, रविंद्र बांदल, अनिल मांडगे, बाळासाहेब चहाळ, चंद्रकांत तांगड, विकास थोरात, दादा चहाळ यांच्यासह पिंपरी गवळी येथिल ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




