सातारा:-स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिंचणेर वंदन येथे अधिक मासानिमित्त जावई सन्मान सोहळा व गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा आयोजित
पत्रकार सुप्रिया पाटसूपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष:-8459060701

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सुप्रिया पाटसूपे महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष
. सातारा:-ग्रामसेवक आदर्श लोक सेवक.
शासन स्तरावरून राबविल्या जाणाऱ्या केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध वैयक्तिक , सार्वजनिक हिताच्या योजना गाव पातळीवर राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या पोहोचवून त्यांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने प्रेरित होऊन ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी व गाव स्तरावरील सर्व कर्मचारी यांना सोबत घेऊन विविध लोकहितोपयोगी योजना राबविल्याबद्दल चिंचणेर वंदन ता सातारा येथे कार्यरत असणारे ग्रामसेवक श्री संजय पतंगराव यादव यांना चिंचणेर वंदन वासीयांच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने गौरविण्यात आले.
. दिनांक 15 ऑगस्ट 2023 ‘ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चिंचणेर वंदन येथे अधिक मासानिमित्त जावई सन्मान सोहळा व गुणवंतांचा गुणगौरव सोहळा व विविध विकास कामांचा उदघाटन सोहळा आयोजित करणेत आला होता. त्यावेळी विविध गाव विकासाच्या योजना राबवून सर्व लोकांना एकत्रित बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास साधून , उत्कृष्ट ग्रामीण विकासाचे कार्य करत असलेबद्दल चिंचणेर वंदन या ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक श्री संजय पतंगराव यादव यांना कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणिय मा श्री महेशजी शिंदे साहेब यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
. या कार्यक्रमास कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय मा श्री महेशजी शिंदे साहेब , सामाजिक कार्यकर्त्या मा डॉ सौ अरुणाताई बर्गे , मा.डॉ सौ प्रियाताई शिंदे , युवाशक्ती फाउंडेशन साताराचे संस्थापक अध्यक्ष मा श्री संग्राम दादा बर्गे , सातारा जिल्हा परिषदेचे माजी जि प सदस्य मा श्री संदीप भाऊ शिंदे , चिंचणेर वंदन ग्रामपंचायतचे सरपंच मा श्री सुधाकर बर्गे , जावई म्हणुन उपस्थित असलेले विवीध क्षेत्रातील मान्यवर , ग्रामपंचायतचे आजी माजी पदाधिकारी , गावातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी , ग्रामस्थ महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.