खटाव:-मायणी मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी साक्षी मोकल हिने पटकावले गोल्ड मेडल.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा
मायणी मेडिकल कॉलेजची विद्यार्थिनी साक्षी मोकल हिने पटकावले गोल्ड मेडल.
मायणी प्रतिनिधी
मायणी येथील नेहमी गोरगरीब लोकां साठी वरदान ठरणारे ग्रामीण भागातील आयुर्वेद महाविद्यलयाची विद्यार्थिनी साक्षी मोकल हिने आरोग्य विज्ञान विभाग नाशिक यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या स्वास्थ्य वृत्त व योगा या विषयांमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गोल्ड मेडल पटकवले आसुंन मायणी मेडिकल कॉलेजची मान उंचावली आहे.
श्री छत्रपती शिवाजी एजुकेशन सोसायटी चे रूरल इन्स्टि ऑफ आयुर्वेद रिसर्च सेंटर आणि हॉस्पिटल येथील सन 2019-20 बॅचची विद्यांर्त्यानी कु साक्षी मोकल हिने तृतीय वर्ष मधील स्वस्थवृत्त व योगा या विषया मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ नाशिक मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षे मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठ मध्ये गोल्ड मिडल पटकावले आहे.
मायणी मेडिकल कॉलेज हे या भागातील गोरगरीब रुग्णांसाठी वरदायिनी असून स्वतःला लोकप्रतिनिधी म्हणणाऱ्यांनी मात्र हे कॉलेज कसे बंद होईल व या भागातील लोकांना सुविधा पासून वंचित ठेवण्याचे पाप यांनी केले आहे परंतु मायणी मेडिकल कॉलेज च्या माध्यमातून अविरत गरीब व गरजूंना सेवा देण्याचे काम अडचणीतूनही देशमुख बंधूंनी सुरू ठेवले आहे. काहीही झाले तरी व कितीही अडचणी आल्या तरी हे कॉलेज बंद पडू न देता या भागातील गोरगरीब जनतेला सेवा पुरवण्याचा व गरीब ,. गरजू कुटुंबातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय पदवी देऊन त्यांच्या पायावर उभे करण्याचा जो डॉक्टर एम आर देशमुख यांनी विडा उचलला आहे तेच काम आम्ही पूर्ण क्षमतेने करीत असल्याचे मत देशमुख बंधूंनी यावेळी बोलून दाखवले.
या विद्यार्थिनीला मार्गदर्शन करणारे शिक्षक
शिक्षक डॉ.विक्रम शेळके , डॉ .महेश कारंडे ,डॉ .दत्तात्रय तांबवेकर ,डॉ .दीपाली काटकर यांचे महाविद्यलच्या वतीने हार्दिक अभिनंदन