क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

खटाव:-सात महिला कुस्तीपटू शोषण विरोधात आरोपींना अटक करण्यासाठी वडूज नगरीत खेळाडूंचे निदर्शने.

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अजित जगताप सातारा

सात महिला कुस्तीपटू शोषण विरोधात आरोपींना अटक करण्यासाठी वडूज नगरीत खेळाडूंचे निदर्शने.

वडूज दि: आपल्या भारत देशाचे नाव उज्वल करण्यासाठी क्रीडक्षेत्रातील मैदानावर आपल्या खेळातून प्राविण्य मिळवणारे भारत देशाचे सात कुस्तीगीर यांचे लैंगिक शोषण झालेले आहे. असा आरोप करण्यात आला आहे. विशेष म्हणजे बेटी बचाव बेटी पढाव असा निर्णय देणाऱ्या भाजपने शोषणकर्त्या भाजप खासदार ब्रूज भूषण चरण सिंह यांच्या पाठीशी ठाम राहिल्यामुळे तमाम मुली व महिला वर्गाचा अवमान झाला आहे. त्याचा निषेध करण्यासाठी शिवाजी चौक, वडूज येथे निदर्शने करून खटाव तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. दिल्ली येथील जंतर-मंतर मैदानामध्ये लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या खेळाडू, महिलांना अक्षरशा पोलिसांनी फरपटत घेऊन गेले. लोकशाहीची कुठली पाळीमुळे भाजप पक्षाने ठेवलेले नाहीत तर दुसऱ्या बाजूला धार्मिक संसद भवन च्या उद्घाघाटनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे व्यस्त होते. एका बाजूला लोकशाहीचे गोडवे गायचे. दुसऱ्या बाजूला हुकूमशाही बघण्यात मिळाली. याचा संपूर्ण देशभर निषेध होत आहे. क्रांतिकारी एक पिढी असलेल्या खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये आज भर उन्हात भाजपच्या खासदार शरण सिंह याचा निषेध करण्यासाठी खटाव तालुक्यातील सर्व खेळाडू एकवटले होते . यावेळी तहसिलदार किरण जमदाडे यांनी निवेदन घेतले.
आज भाजप केंद्र सरकारचा अख्यात्यारीत असून त्याचा धिक्कार करण्यात आला. खा. सिंह यांचा धिक्कार असो … अशा घोषणाबाजी करून निदर्शकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी खेळाडू व महाराष्ट्र केसरी धनाजी फडतरे, बापूसाहेब माने, अमीन मुल्ला, प्रमोद राऊत, चंद्रकांत गोडसे, प्रदीप पवार ,अमोल फडतरे ,अर्जुन पाटील, उमेश पाटील, संतोष मांडवे, अक्षय घाडगे, वैभव माने, अमोल साळुंखे ,प्रवीण गोडसे, सनी जाधव, समर्थ झिमरे,रेवेदिका बेंडे , साक्षी गुरव, रूषाली पाटोळे, शरयू डोंगरे, समृध्दी इंगोले, रूपाली पाटोळे, आर्या बागल, वेदिका शिंगाडे, शर्वरी पाटोळे, चैत्राली शिंगाडे व खटाव तालुक्यातील खेळाडू मुली, मुले उपस्थित होते.

त्याच बरोबर सामाजिक कार्यकर्ते परेश जाधव, आबासाहेब भोसले, संतोष दुबळे, सुरेश लंगडे, राम कुलकर्णी यांच्यासह राजकीय नेते
रणजितसिंह देशमुख, डॉ महेश गुरव, शहाजीराजे गोडसे, श्रीमती शशिकला देशमुख, ,विजयकुमार शिंदे, इम्रान सिकंदर बागवान, राजू फडतरे, अक्षय थोरवे, अजित साठे अमरजीत कांबळे, तानाजी वायदंडे, डॉ. संतोष गोडसे,, आनंदा साठे, सुरेश पवार, राहुल सजगणे, क्रीडा शिक्षक आर एन पवार व अनेक क्रीडा प्रेमी कुस्तीगीर तसेच राजकीय अभ्यासक धनंजय चव्हाण, लालासाहेब माने, आदी मान्यवर उपस्थित होते.

———————————————————–
फोटो – खटाव तालुक्यातील वडूज येथे निदर्शने करताना खेळाडू व राजकीय नेते (छाया- अजित जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button