खटाव:-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री शक्ती समाधान शिबिर यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री शक्ती समाधान शिबिर यशस्वी होण्यासाठी अधिकाऱ्यांनी मानसिकता बदलणे गरजेचे.
वडूज दि: शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी. यासाठी केंद्र व राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करतात. परंतु, प्रत्यक्षात मात्र अशा काही योजना लोकांपर्यंत पोहोचल्या तरी त्याचा लाभ सामान्यांना मिळत नाही. त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने शासन आपल्या दारी या अभियानाच्या अंतर्गत महिला बाल विकास विभाग यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर श्री शक्ती समाधान शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराला महिला वर्गाची गर्दी झाली असली तरी अधिकारी वर्गाची मानसिकता जैसे थे असल्याचे दिसून आले आहे. ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही महिलांनी केले आहे. त्याचा निश्चितच विचार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासकीय पातळीवर विविध योजनांची आकडेवारी मांडली जाते. त्याला व्यापक प्रसिद्धी मिळावी या दृष्टीने प्रयत्न केला जातो. परंतु वास्तवता फार भयानक आहे. अनेक योजनेची माहिती लोकांपर्यंत पोहोचली असली तरी काही योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करताना लाभार्थीला आर्थिक मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो. त्यानंतर लाभ मिळेल याची खात्री नसते. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करून पुन्हा एकदा ””नव्या खुर्ची वर जुनी अधिकारी”’ अशा पद्धतीने थोडं नाव बदलून नवीन योजना कार्यनीत केली जाते. याला काही चांगले अधिकारी अपवाद असले तरी त्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होऊ लागली आहे.
वडूज येथील या शिबिरासाठी अवघ्या ३०७ महिलांच्या अर्ज प्राप्त झालेले आहेत या अर्जापैकी २७८ महिलांची सुनावली व १०६ अर्ज प्रलंबित राहिलेले आहेत सदर प्रलंबित अर्ज व सदर महिलांना ३०७ अर्ज करण्यासाठी जी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ती परिस्थिती कशामुळे झाली? त्याला जबाबदार कोण? त्यांच्यावर कारवाई होईल का? या प्रश्नांना जाणीवपूर्वक बगल दिली गेलेली आहे.
सध्या शासकीय कामकाज म्हणजे रामभरोसे झालेले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला लागत असलेला विलंब तसेच अधिकारी वर्गाच्या हातात सर्व सूत्र आल्यामुळे अनेक समस्या निपटारा करताना अडचणी येत आहेत. वडूज ता. खटाव येथील पंचायत समितीच्या बचत सभागृहात झालेल्या या मेळाव्यात महिला वर्गाला सन्मान मिळण्याऐवजी त्यांना नाश्त्यासाठी रांगेत उभे केले गेले. तसेच अनेक विभागाचे अधिकारी गैरहजर होते. जे अधिकारी हजर होते. त्यांच्याकडे समस्या घेऊन जाण्यामध्ये महिलांना संकुचित वाटत होते. कारण, ज्या अधिकाऱ्याकडे यापूर्वी अर्ज केला होता. त्या अधिकाऱ्याने काम न केल्यामुळे पुन्हा त्यांच्याकडे तक्रार करणे. नव्याने गाऱ्हाणी मांडणे. हे काहींना पटले नाही. त्यामुळे अनेक महिला या शिबिराला गैरहजर राहिल्या होत्या. असं पुन्हा कधी घडू नये अशी अपेक्षा महिला वर्गाची आहे. विशेषतः सार्वजनिक उपक्रमाद्वारे नागरी सुविधा देणाऱ्या यंत्रणा विरोधात प्रचंड रोष व राग असून त्याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वीज महामंडळ, पुरवठा शाखा, बांधकाम विभाग, महसूल विभाग अशा अनेक विभागांमध्ये दस्तुरखुद महिलांना न्याय मागवावा लागतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सेवेमध्ये आलेला व्यक्ती व महिला प्रवाशांची होत असलेली कुचुंबना याबाबतही महिलांनी तक्रारी केल्या. पण या तक्रारीबाबत निपटारा होणे गरजेचे आहे. वडूज बस स्थानकामध्ये स्थानक प्रमुख हजर नसल्याने कोणती बस कोणत्या मार्गाने जाणार आहे? हे सांगण्यात येत नाही. ज्याच्याकडे स्थानक प्रमुख पद आहे. ते या ठिकाणी फिरकत नाही. शौचालय व त्यांच्या अवस्था बिकट असून स्वच्छता ग्रह अभावी महिलांचे कुचुंबणा होत आहे. हे शिबिरामध्ये येऊन सांगावे लागते. ही खरं म्हणजे आठव्या वेतन आयोगाची वाट पाहणाऱ्या काही अधिकाऱ्याने आत्मचिंतन करावे. अशीच बाब आहे. त्यामुळे अशा शिबिरातून लोकांचे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. अन्यथा एकमेकांच्या सत्कार करणे. एकमेकांची पाठ थोपटून घेणे. शासकीय निधीचा वापर लाभार्थी पर्यंत पोहोचवण्यात अपयश आले तरी यश मानून घेणे. ही धोकादायक बाब ठरलेली आहे. याचा जाणीवपूर्वक विचार व्हावा. अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या अनेक अधिकारी सुद्धा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. त्यांच्या मुळे काही महिलांना न्याय मिळाला ही बाब निदर्शनास आली आहे. त्याचे अनेकांनी कौतुक केले आहे.
———————&—————————————
छाया– वडूज बस वडूज येथील बचत गट बचत भवन येथे झालेल्या महिला शिबिरातील क्षणचित्रे (छाया निनाद जगताप, वडूज)