ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-डॉ. वैभव मानेच्या कार्याची दखल रिपब्लिकन पक्ष नेहमीच घेत राहील- कुणाल गडांकुश

पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

पत्रकार अजित जगताप सातारा

डॉ. वैभव मानेच्या कार्याची दखल रिपब्लिकन पक्ष नेहमीच घेत राहील- कुणाल गडांकुश

वडूज दि: सर्व सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले नढ वळ ता. खटाव गावचे सुपुत्र डॉक्टर वैभव माने यांनी आपल्या विधायक कार्यातून सामाजिक जाणीव ठेवले आहे. त्यांच्या कार्याची दखल रिपब्लिकन पक्ष नेहमीच घेत राहील असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे खटाव तालुका अध्यक्ष कुणाल गडांकुश यांनी वडूज ता खटाव येथे झालेल्या भव्य कार्यक्रमात केले.
पुरोगामी चळवळीचा केंद्रबिंदू असलेल्या खटाव तालुक्यातील कार्यकर्त्यांना सध्या विकास कामांमध्ये भाजप सारख्या पक्षाचे समर्थ साथ लाभत आहे. सध्या परिवर्तनाचे वारे वाहत असून यामध्ये सामाजिक कार्याची जाणीव ठेवणारे डॉ. वैभव माने यांचा रिपब्लिकन पक्षाला आदर वाटत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भविष्यातील तमाप दलित बांधवांच्या विकासासाठी भाजप मित्र पक्षाची युती घडवून आणलेली आहे .या युतीला बांधील राहून भाजप जिल्हाध्यक्ष तथा माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे कट्टर समर्थक डॉ. माने यांनी सर्व जाती धर्माला एकत्र करून त्यांच्या विकासासाठी सढळ हस्ते मदत केलेली आहे .म्हणूनच आज रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार व त्यांच्या गौरव होत आहे. ही अभिमानास्पद बाब आहे असे श्री.गडांकुश यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. माने यांना मानाचा फेटा, शाल, पुष्प, श्रीफळ व केक कापून दीर्घायुष्य लाभो. अशा शुभेच्छा देऊन अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. या वेळेला पत्रकार अजित पवार, नितीन राऊत, गोरेगावचे सरपंच विक्रम डोईफोडे ,पोलीस पाटील महादेव बनसोडे, राहुल कोळी, उद्योजक गणेश चव्हाण, रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस संतोष भंडारे, पँथर अजित कंठे, जिल्हा उपाध्यक्ष अजित नलावडे त्याचबरोबर विविध शासकीय अधिकारी, पदाधिकारी सिद्धेश्वर कुरोलीचे माजी सरपंच राजू फडतरे, नंदकुमार डोईफोडे, धनंजय चव्हाण, हर्षल पवार, सौ रीना जावळे, सुधाकर शीलवंत प्रताप जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. माने यांच्या वाढदिवसानिमित्त विविध गावातील सामाजिक व शैक्षणिक तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी गरीब लोकांना साहित्य व फळ वाटप करून शुभेच्छा दिल्या.वैद्यकीय क्षेत्रा सोबतच प्रगतशील शेतकरी म्हणून शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणारे डॉ. माने बंधू म्हणजे खटाव तालुक्यामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व ठरलेला आहे. असे ही मान्यवरांनी सांगितले.
___________________________________________

फोटो- डॉक्टर वैभव माने यांचा नागरिक सत्कार करताना रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष कुणाल
गडांकुश व मान्यवर (छाया – सुरज पोतदार, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button