खटाव:-सर्व धर्म समभाव मानणाऱ्या निलेश लोहार यांचा वाढदिवस साजरा.
पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION – राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार अजित जगताप सातारा
सर्व धर्म समभाव मानणाऱ्या निलेश लोहार यांचा वाढदिवस साजरा.
वडूज दि: वडूज नगरीतील लोहार वस्तीमध्ये राहणारे निलेश लोहार म्हणजे खऱ्या अर्थाने भारतीय संविधानाची प्रत व त्याबद्दल आदरभाव व्यक्त करणारे व्यक्तिमत्त्व आहे. सर्व धर्मीय लोकांच्या सुखदुःखात व सार्वजनिक कार्यक्रम तसेच सणांमध्ये मोठ्या उत्साहात सहभागी होऊन आपली मानवतावादी ओळख त्यांनी निर्माण केलेली आहे. म्हणून शेती उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयामध्ये नवनिर्वाचित उपसभापती विजयकुमार शिंदे यांच्या हस्ते निलेश लोहार यांना शाल व श्रीफळ तसेच केक कापून अभिष्टचिंतन केले.
या आनंद सोहळ्याला वडूज नगरीतील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होते. तसेच सर्वपक्षीय नेते यांनी आवर्जून निलेश लोहार यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला संचालक शैलेश वाघमारे, सामाजिक कार्यकर्ते आनंदा साठे, पत्रकार दत्तात्रय इनामदार, अजित जगताप, उद्योजक धनंजय चव्हाण, सौरभ उंडाळे, अक्षय कुंभार व मान्यवर मंडळी उपस्थित होते.
सर्व जाती-धर्माचा आदर म्हणूनच माझा सर्व धर्मीय वाढदिवस साजरा करत आहे. ही माझ्यासाठी प्रेरणादायक बाब असून यापुढेही मी सामाजिक कार्य करून युगपुरुषांच्या विचाराप्रमाणे वाटचाल करीन अशा शब्दात युवा नेते निलेश लोहार यांनी मनोगत व्यक्त केले. आजच्या वाढदिवसानिमित्त समाजातील सर्व स्तरातील लोकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अनेकांच्या कार्यक्रमांमध्ये रांगोळी काढणाऱ्या निलेश लोहार यांनी अनेकांच्या हातावर मेहंदी काढलेली आहे. त्यामुळे आजचा वाढदिवस हा खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव मानणाऱ्या कार्यकर्त्याला शुभेच्छा देताना मानवता धर्म व त्याचे पालन केल्याचा आनंद सर्वांना झाला आहे.
_______________________________________
फोटो _ वडूज शेती उत्पन्न बाजार समिती उपसभापती विजयकुमार शिंदे यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त निलेश लोहार यांचा गौरव करताना मान्यवर (छाया सुरज पोतदार, वडूज)