सांगली:-27 मे रोजी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन नरसोबाची वाडी येथे संपन्न होणार.
पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:-9890318605
ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार प्रा दिलीप पुस्तके सातारा
27 मे रोजी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन नरसोबाची वाडी येथे संपन्न होणार.
मायणी प्रतिनिधी__भगवान दत्तात्रयाचे विश्रांती स्थान असलेले क्षेत्र नरसोबाची वाडी येथे वाघजाई देवस्थान ट्रस्ट वरूड तालुका खटाव व सातारा ज्योतिष मंडळ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 27 मे व 28 मे रोजी राज्यस्तरीय ज्योतिष अधिवेशन नरसोबाची वाडी येथे संपन्न होणार असल्याची माहिती संयोजक वेध संपन्न शास्त्री नंदकुमार जोशी वरूड तालुका खटाव यांनी दिली. शनिवारी सकाळी दहा वाजता कर्नाटक येथील आद्य शंकराचार्य वल्लभानंद महाराज यांच्या अध्यक्षतेखाली व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई यांच्या हस्ते उद्घाटन समारंभ होणार आहे. या कार्यक्रमास आमदार प्रकाश अण्णा आवाडे, दाते पंचांग प्रमुख मोहनजी दाते सातारा ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमणलाल शहा, महाराष्ट्र ज्योतिष मंडळाचे अध्यक्ष अनिल चांदवडकर, बृहन महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार, संतोष खोबारे श्रीधर कुलकर्णी, विशेष अतिथी विलास पुजारी अमोल पुजारी सुहास समुद्र मुंबई यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. व्याख्याते व विषय पुढीलप्रमाणे,____प्रिया मालवणकर_कुंडलीतील योग व साधना सौ अनुसया मालू__कुंडलीतील धनयोग एनडी फडके_विवाह समस्या व कायदा डॉक्टर विकास खिलारे सातारा वैवाहिक सौख्य नारायण सुट्टणकर हातावरील रेषा भाग्य बदलतात, डॉक्टर डी जे सावंत कृष्णमूर्ती व पारंपारिक समन्वय डॉक्टर अमरनाथ स्वामी___कुंडलीतील योग व करिअर आनंद लक्ष्मण पांडव___ कुंडलीतील ग्रहांचे योग व त्यावरील दैवकी उपाय डॉक्टर प्रदीप जाधव_जुळ्यांच्या कुंडल्या व त्यांचे भवितव्य रविवार दिनांक 28 रोजी वेदशास्त्री गोडबोले_परिहार श्रीधर कुलकर्णी इस्लामपूर प्रचलित गुणमेलन पद्धती डॉक्टर नरेंद्र उमरीकर वास्तू रेमेडीज, सचिन बेहेरे कराड वास्तु व प्राचीन ग्रंथपरंपरा प्रदीप पंडित पुणे_शिव स्वरुद्र शास्त्र प्राची मलमकर श्रीयंत्र सौ जयश्री बेलसरे कुंडलीतील राजयोग सौ विवा साठे ___मुद्रा ज्योतिष, सिद्धेश्वर मारटकर_राजकीय भवितव्य, अनिल चांदवडकर नाशिक शापित कुंडली ,विजयानंद पाटील कोल्हापूर ,युनिक सूक्ष्मदशा_सदरचा कार्यक्रम अष्टविनायक सांस्कृतिक हॉल येथे संपन्न होणार असून पश्चिम महाराष्ट्रातील ज्योतिष प्रेमींनी अभ्यासकांनी सर्वसामान्य लोक ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा अशी आवाहन वेदशास्त्री पंडित नंदकुमार जोशी यांनी केली आहे.