खटाव:-आ.महेश लांडगे यांच्याकडून स्व.प्रविण पिसाळ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन व कुटुंबास ५ लाख रुपयांची मदत
पत्रकार सागर पिसाळ खटाव:-7875411591

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार सागर पिसाळ खटाव
आ.महेश लांडगे यांच्याकडून स्व.प्रविण पिसाळ यांच्या कुटुंबियांचे सांत्वन व कुटुंबास ५ लाख रुपयांची मदत.
‘‘वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन’’ ची स्थापना करणारे स्व. प्रवीण पोपटराव पिसाळ यांचे अकाली निधन झाले.
हजारो मराठा युवकांना उद्योग- व्यावसायात मार्गदर्शन, मदत आणि रोजगार मिळवून देण्यासाठी प्रवीण पिसाळ यांनी काम केले. मात्र, त्याच्या अकाली निधनामुळे पिसाळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागणार, हे निश्चित आहे. पण, आपल्या समाजासाठी झटणाऱ्या या तरुणाच्या मृत्यूपश्चात त्याच्या कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणे, हे आपले नैतिक कर्तव्य आहे. याच भावनेतून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर एक मुलगा, बंधू म्हणून पिसाळ कुटुंबियांच्या अडचणीत धावून जाण्याचा आणि मुलगी शुभ्रा हिला शैक्षणिकदृष्टया सर्वोतोपरी मदत करण्याचा संकल्प केला आहे. तमाम मराठा बांधवांच्या वतीने आज श्रीमती काजल प्रवीण पिसाळ आणि कुटुंबियांचे सांत्वन केले आणि ५ लाख रुपये आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी आ. लांडगे यांनी स्व. प्रविण पिसाळ यांनी मराठा समाजाप्रति सुरू केलेले सामाजिक कार्य आणि मराठा आरक्षणासाठीचा लढा या पुढील काळात अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार आमचा आहे. हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, अशी भावना व्यक्त केली.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)