कराड:-पार्ले ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार – पाण्याविना लोकांचे हाल.
पत्रकार विनोद पाटील सातारा:-9762274165

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION-राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
पत्रकार विनोद पाटील सातारा
पार्ले ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार – पाण्याविना लोकांचे हाल.
पारले, ता.कराड येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार भर उन्हाळयात पाच दिवस झाले गावचा पाणी पुरवठा पुर्ण बंद आहे.
पारले गावास सन २०१७ ला मा.आमदार बाळासाहेब पाटील यांचे शिफारसीनुसार व तात्कालीन सरपंच श्री.राहुल पाटील व श्री.प्रकाश पाटील काका यांचे प्रयत्नातून २४×७ योजना मंजुर व कार्यकरत झाली. त्यानंतर पार्ले ग्रामपंचायत सत्तांतर झाले व गावात कॉंग्रेसचे नेते श्री.अविनाश नलवडे यांची सत्ता आली. तेव्हापासुन या योजनेचे तीन तेरा वाजले आहेत. पाणीपुरवठा सतत बंद पडते,त्यामुळे लोकांना खुप त्रास सहन करावा लागतो .आता गावात टँकर ने पाणी पुरवठा केला जात आहे.तरी अजुन तीन दिवस पाणी पुरवठा होणार नाही अशी माहिती मिळते.
तसेच ग्रामपंचायतीची पिठाची गिरणी ही लोकांना स्वस्त दरात चालु होती.तीही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे एक महिने बंद पडली आहे.
यामुळे लोकांमध्ये ग्रामपंचायत कारभाराविषय नाराजी व्यक्त केली आहे.