खटाव -मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला. (WMO) चे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचं निधन.
पत्रकार सागर पिसाळ खटाव:-7875411591

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION- राष्ट्रीय अध्यक्ष
संपादक प्रल्हाद चव्हाण (8208717483
पत्रकार सागर पिसाळ खटाव
मराठा समाजाचा बुलंद आवाज हरपला. (WMO) चे संस्थापक प्रवीण पिसाळ यांचं निधन.
चोराडे ::- सातारा जिल्ह्यातील चोराडे सारख्या छोट्याश्या गावातून संपूर्ण जगभर आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ,मराठा समाजाला सोशल मीडियाच्या आधारे संघटित करून, समाजाला आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य क्षेत्रात पुढे नेण्यासाठी मार्गदर्शन करणारे मा.प्रविणजी पिसाळ यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
मराठा समाजाला एकत्र करायचे काम World Maratha Organization (WMO) च्या माध्यमातुन प्रवीण पिसाळ यांनी केले. भारत व भारताबाहेरील सर्व बांधवाना एक करायचे इतके मोठे काम केले. Corona काळात लोकांची मदत असो की कुणाची काही अडचण असो.. मराठा प्रवीण सर ने ते सोडवण्याचे काम केले… मराठा तरूणाचे सगळ्यात मोठे नेटवर्क त्यानी फेसबुक च्या माध्यमातुन उभे केले.
जगातील मराठा जोडण्याचा अत्यंत महत्वपूर्ण धेय्यवाद घेऊन मार्गक्रमण करणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, ज्यांनी शहर खेडयांपासुन देश विदेशापर्यन्त वर्ल्ड मराठा ऑर्गनाइजेशन च्या माध्यमातुन सुरू करून रस्त्यांवरिल अपघाता पासुन दुर्धर आजारांच्या अवघडातल्या अवघड शस्त्रक्रियांत समाजबांधवांना हक्काची परिपुर्ण साथ दिली.
त्यांच्या जाण्याने सकल मराठा समाजाचे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वमराठा समाज व विविध संघटना सामाजिक व राजकीय क्षेत्रातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
प्रतिनिधी – सागर पिसाळ (7875411591)