पुणे:-पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 136 पोलीस अंमलदारांची पदोन्नती आणि 5 अधिकारी सेवानिवृत्त.
प्रतिनिधी शफिक शेख निगडी पुणे:-9767275783

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण :-8208717483.
पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील 136 पोलीस अंमलदारांची पदोन्नती आणि 5 अधिकारी सेवानिवृत्त.
निगडी, दि. 2 (शफिक शेख) – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील 136 पोलीस अंमलदार यांची पदोन्नती झालेल्या आणि वयोमानानुसार सेवानिवृत्ती झालेल्या 5 अधिकारी/अंमलदार यांचा सत्कार सोहळा कार्यक्रम पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय, निगडी येथे पार पडला.
सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या पोलीस अंमलदार यांच्या पदोन्नतीचे आदेश प्रशासकीय अधिकारी, पोलीस मुख्यालय, पिंपरी-चिंचवड यांना आयुक्त शिंदे यांनी दिले होते. त्याप्रमाणे 45 पोलीस हवालदार यांना सहा. पोलीस उपनिरीक्षकपदी तसेच 95 पोलीस अंमलदारांची पोलीस नाईक ते पोलीस हवालदारपदी पदोन्नती देण्यात आली. अशा सर्व पदोन्नती देण्यात आलेल्या अंमलदारांना सपत्नीक बोलावून त्यांना पुष्पगुच्छ देवून मा. आयुक्तांनी त्यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे अनिल राजाराम दबडे सहा. पोलीस आयुक्त विशेष शाखा, नंदू ज्ञानोबा खुळपे प्रशासकीय अधिकारी आस्थापना शाखा, संजय आनंदराव काळे पोलीस उपनिरीक्षक, विनायक दगडू वरपे पोलीस हवलदार, संजय बबन भागवत पोलीस नाईक यांची नियत वयोमानानुसार पोलीस दलातून सेवानिवृत्ती झाल्याने त्यांचाही आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाप्रसंगी मा. पोलीस आयुक्त श्री. अंकुश शिंदे, अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपआयुक्त मुख्याालयय काकासाहेब डोळेे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ 1 श्री. मंचक इप्पर यंाचेसह पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सर्व प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सर्व सत्कारमुर्ती यांना पुढील आयुष्यासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.