फलटण:-पावसामुळे दुध उत्पादक शेतकरी कंगाल, दलाल मालामाल.!!!
पत्रकार विनोद पाटील सातारा जिल्हा अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
पावसामुळे दुध उत्पादक शेतकरी कंगाल, दलाल मालामाल.!!!

फलटण:- फलटण तालुक्यातील शेतकरी सध्या पावसाळी वातावरण असल्याने जनावरांना चारा देण्यासाठी अडचणी येत आहेत.यावर मात करण्यासाठी शेतकरी मका,ऊस,घास इत्यादी पिकांचे मुरघाराची कडबाकुट्टी करण्यासाठी कामाला लागले आहेत.
मका कापणे व मुरघास तयार करुन मुरघाच्या बॅगा तयार करण्याची घाई गडबड ग्रामीण भागात दिसून येते आहे.फलटण तालुक्यातील गिरवी, साखरवाडी, राजाळे, गोखळी बरड राजूरी जिंती फडतरवाडी निंबळक होळ तरडगांव हिंगणगाव सासवड आदर्की बिबी विडणी पाडेगांव उपळवे दुधेबावी वाखरी कुरवली या ग्रामीण मुरघाची निर्मिती व साठा करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे दिसून येते आहे.
मुरघास तयार करुन देण्यासाठी ग्रामीण भागातील मुरघास सप्लायर्स ठेकेदार मालामाल होत आहेत.मुरघार तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा खुप आर्थिकदृष्ट्या खर्च वाढत असल्याने दुग्धव्यवसाय धोक्यात आला आहे.अतिवृष्टी व सतत संततधार पाऊस चालू असल्याने ओला व सुका चारा जनावरांना मिळत नाही.हि मोठी समस्या निर्माण झाली आहे.पावसाच्या ओलावा टिकून राहतो त्यामुळे जनावरांना गोचीड पिसा माशा डास चावायला लागतात त्यातून ताप,लाळ गळणे,पुरळ येणे यासारखे आजार पसरण्यास सुरवात झाली आहे.जनावरांचे गोठे ओले राहात आहेत.पावसाळी वातावरणामुळे जनावरांच्या दुध उत्पादनात कमालीची घट झाली आहे.आजारी जनावरांना औषध उपचार करण्यासाठी शेतकऱ्यांना खुप आर्थिक खर्च वाढत आहे.जनावरांना उपचारासाठी येणारे खाजगी व्हेटरनरी पशुवैद्यक जनावरांच्या उपचारासाठी अवाच्या सव्वा पैसे घेत आहेत.अक्षरश: शेतकऱ्यांची आर्थिक लूट सर्वत्र चालू आहे.खाजगी व्हेटरनरी पशुवैद्यक व मेडीकल दुकानदार संगनमताने शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या आर्थिक लूट करत आहेत.सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यात मनुष्य बळ नसल्याने पशुसंवर्धन अधिकारी व पशुसंवर्धन विभाग फक्त सरकारी वेतन भत्ते यासाठी उरला आहे.
दुध उत्पादक शेतकरी चारा, वाहतूक,औषधं, उपचार, पशुखाद्य,पेंड भुसा,निवारा,गोठा स्वच्छता, साफसफाई,मजूर यांच्या आथिर्क खर्चाच्या चक्रव्यूहात अडकला आहे.एवढं सगळं करुन दुध डेअरी कडून दुधाला दर चांगला मिळत नाही. दुध उत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या कंगाल झाला असून कर्जबाजारी झाला आहे.दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर पशुखाद्य दुकानदार,डेअरी मालक,मुरघास सप्लायर्स ठेकेदार,खाजगी पशुवैद्यक व मेडीकल दुकानदार,चारा विकणारे, वाहतूक मालक इत्यादी दलाल आर्थिकदृष्ट्या मालामाल होत असल्याचे दिसून येते आहे.




