कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-वडूज शेती उत्पन्न बाजार समिती खटाव विकास १३ विरोधकांना ५ जागा.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

वडूज शेती उत्पन्न बाजार समिती खटाव विकास १३ विरोधकांना ५ जागा.

वडूज दि: संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या नेतृत्वाखालील खटाव तालुका विकास आघाडीने बहुमत प्राप्त केले असून सोसायटी मतदार संघातील ११ व इतर २ अशा १३ ठिकाणी विजय संपादन केला. राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पाच जागेवर समाधान मानावे लागले. विजयाची खात्री पटताच माजी आमदार घार्गे समर्थक तसेच भाजप, काँग्रेस व मित्र पक्षाने जल्लोष केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे, संदीप मांडवे यांनी एकट्याने खिंड लढवून पाच जागेवर विजय संपादन केला. त्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मोलाची साथ लाभली .
याबाबत माहिती अशी की , वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतदान मोजणी प्रत्यक्षात दुपारी साडेबारा वाजता सुरू झाली. ती चार वाजता संपुष्टात आली. साडेचार तास या मतमोजणी प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती जमातीच्या मतदारसंघात शैलेंद्र रामचंद्र वाघमारे यांना ५४३ व त्यांचे प्रतिस्पर्धी अमरजीत सत्यवान कांबळे यांना ५४० मते मिळाल्यामुळे फेर मोजणी घेण्यात आली .त्यामध्ये आणखीन एक मताची वाढ झाली तर या ठिकाणी २२ मते बाद झाली. अखेर श्री. वाघमारे यांना विजय घोषित केल्यानंतर वातावरण शांत झाले. सदरच्या फेर मतमोजणीसाठी दहा हजार रुपये रक्कम जमा करावी लागली. परंतु, एकमताची वाढ झाल्यामुळे दोष कोणाचा? याची चर्चा दबक्या आवाजात सुरू झालेली आहे. फेर मतमोजणी मध्ये दोष आढळल्यास सदरची रक्कम परत द्यावी की नाही? याबद्दल अनेक मत मतांतर होऊ लागलेले आहे.
या मतमोजणीच्या वेळेला सोसायटी मतदारसंघातून खटाव विकास आघाडीचे महेश घार्गे ६३६ अभिजीत देशमुख ६२६ ज्ञानेश्वर नलवडे ६१७ दत्तात्रय पवार ६१६ राहुल फडतरे ६४७ सुनील फडतरे ६१२ विजयकुमार शिंदे ६०२ महिला राखीव दत्ता जगदाळे ६४७ सुनिता मगर ६२५ इतर मागासवर्गीय दीपक विधाते ६५६ ग्रामपंचायत मतदार संघातून अण्णा वलेकर ५३६ आर्थिक दुर्बल विनोद घारगे ५४५ हे खटाव विकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले तर विमुक्त जाती जमाती शरद पाटील ६२५ मतदारसंघात ५३९ अनुसूचित जाती जमाती शैलेंद्र वाघमारे ५४४ ग्रामपंचायत मतदार संघ अभिजीत जाधव ५३९व्यापारी आर्थिक मतदारसंघ संकेत मामाने ४२६ गिरीश शहा४२४ हमाल मापाडी स्वप्निल गाडगे ३९५ अशी मते मिळाली.
सोसायटी मतदार संघात एकूण १२६५ मतदार होते त्यापैकी १२२८ मतदान झाले. ३७ मते बाद ठरली महिला राखीव मध्ये १२५२ मतदार मतं झाली 13 मते बाद झाली.इतर मागासवर्गीय मध्ये १२५० मतदान झाले १५ मते बाद ठरली. भटक्या राखीव मध्ये १२१६ मतदान झाले ४९ मते बाद झाली ग्रामपंचायत मध्ये१०८३ मते २३ मते बाद झाली अनुसूचित जमातीमध्ये १०८४ जणांनी मतदान केले. २२ मते बाद झाली आर्थिक दृष्ट्या निर्मूलनमध्ये १०८२ मतदान व २४ मते बाद झाली व्यापारी अडत्यांमध्ये ७०२ मतदान झाले ४ मते बाद ठरली हमाल मापाडी मध्ये ६९९ मतदान झाले १९ मते बाद ठरली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुषमा शिंदे, नायब तहसीलदार सचिन कर्णे यांनी काम पाहिले. स पो नि दत्तात्रय दराडे, उपनिरीक्षक दौलताडे, माने व ३० पोलीस जवान तसेच १० होमगार्ड यांनी बंदोबस्ताचे काम पाहिले .
निकाल जाहीर होतात कार्यकर्त्यांनी जल्लोष करून गुलालाची उधळण केली. अपेक्षा नुसार खटाव विकास आघाडीला यश मिळाल्यामुळे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या मस्तकावर दुहेरी मुकुट आलेला आहे. यापूर्वी जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांनी यश संपादन केले होते त्यानंतर बाजार समितीच्या निवडणुकीतही त्यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले असून तिसऱ्यांदा ते काय चमत्कार करतात ?याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
खटाव विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी चांगली मोट बांधली असली तरी मायणी गटाने राष्ट्रवादीचा आपला झेंडा अबाधित राखला. ही या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरलेले आहे. सदर निवडणुकी प्रक्रियेमध्ये सर्वच राजकीय पक्षांनी सहभाग घेतला होता. त्यांचे आमदार प्रभाकर घार्गे यांनी मनःपूर्वक आभार मानले. आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, डॉ. दिलीप येळगावकर, ध्येयशील कदम, रणजीत भैय्या देशमुख, संजीव साळुंखे डॉ सुरेश जाधव, डॉ महेश गुरव, विक्रम रोमण, धनंजय चव्हाण, वैभव पवार, धनाजी चव्हाण, अनिल माळी यांनी खटाव विकास आघाडीचा प्रचाराचा धुरा सांभाळला होती. तर राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरेंद्र गुदगे, नंदकुमार मोरे ,श्रीमंत गायत्री देवी पंतप्रतिनिधी, राजू फडतरे, विजय शेटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सूर्यभान जाधव, अनिल पवार तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने श्रीकांत देवकर यांनी प्रचार यंत्रणा कार्यरत ठेवली होती. पण अपक्षांना यश मिळाले नाही. हमाल मापारी मतदारसंघात कपबशीचे उदय माळवे यांना१७२ मते मिळाली. बाकी अपक्षला तीन आकडे संख्या गाठता आली नाही. तहसीलदार कार्यालयात झालेल्या या मतमोजणीच्या वेळेला सर्वच पक्षाचे समर्थक प्रतिनिधी हजर होते अत्यंत शांततेने मतमोजणी प्रक्रिया झाली. यावेळी परिवक्षधिन आय. पी. एस. अधिकारी बली यांनी भेट दिली.
——————————————
फोटो – वडूज शेती उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूक मतदान प्रक्रिया

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button