खटाव:-वडूज मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीने दोन महिला जखमी.
प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अजित जगताप सातारा
वडूज मध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या गळतीने दोन महिला जखमी.
वडूज दि. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढली असून उन्हामुळे अंगाची लाहलाही होत असतानाच आज रविवारी सायंकाळी साडेसात वाजता स्वयंपाक करताना घरगुती गॅस सिलेंडरची गळती झाल्याने स्फोट झाला. त्यामुळे दोन वयोवृद्ध महिला जखमी झाल्या.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडूज नगरीतील दलित- शोषित- कष्टकरी व शेतमजूर वस्ती असणाऱ्या इंदिरानगर मध्ये माय- लेकी राहत होत्या. रात्रीच्या जेवण बनवण्याच्या घाई गडबडीमध्ये सिलेंडरने पेट घेतल्यामुळे ताराबाई नाना आवळे वय-७५ व त्यांच्याकडे शेजारी बसण्यासाठी आलेल्या सत्यभामा बळवंत खुडे वय- ७० या दोघींना भाजले.
यावेळी घरगुती साहित्याचे ही खूप मोठे नुकसान झाले. .कालच शनिवारच्या बाजारातून आणलेल्या वस्तू त्यांनी ठेवले होत्या. त्याचे प्रचंड नुकसान झालेले आहे. गरीब व कष्टकरी असलेल्या आवळे व खुडे यांना प्राथमिक उपचार वडूज येथील डॉक्टर नारायण बनसोडे यांच्या दवाखान्यात करण्यात आल्या. त्यानंतर १०८ शासकीय रुग्णवाहिकेने त्यांना सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. याबाबतची नोंद वडूज पोलीस ठाण्यात झाली आहे.
—————————————————————————————–
फोटो – गॅस सिलेंडर गळतीने झालेले नुकसान,,,, (छाया – अजित जगताप )