वैजापूर:- कृषी उत्पन्न बाजार समिती समोर 40 क्विंटल कांदा फेकुन शेतकऱ्याने भाववाढीसाठी दिला आंदोलनाचा ईशारा.
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे छत्रपती संभाजीनगर:9890949872

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी शिवनाथ चिकणे छत्रपती संभाजीनगर
वैजापूर:-जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अतुल भाऊ खुपसे पाटिल याच्या आदेशानुसार व अनिल पाटील शेळके याच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाप्रमुख विजय वाघ याच्या अध्यक्षतेखालील पदाधिकाऱ्यानी कुषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मोटे साहेब याना निवेदन देण्यात आले आहेत कि वैजापूर तालुक्यातील कुषी उत्पन्न बाजार समितीच्या कादा मार्केट मध्ये शेतकरी श्री मनोज नळे या शेतकऱ्यांनी शुक्रवारी आपला 40 क्विटल कांदा विक्रीसाठी आणला असता सदर काधाचा दुपारी झालेल्या निलावात 270 रू प्रति क्विंटल निलाव करण्यात आला परतु इतर बाजार भावापेक्षा वैजापूर कु.उ.बा. समितीमध्ये भाव कमी का असा प्रश्न विचारला असता सदरील कुषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांला निलावाची पावती दिली नाही याबाबत सचिव मोटे याच्यासोबत फोन व्दारे संपर्क केला असता त्यांनीही दखल घेतली नाही त्यामुळे बाजार समितीचा निषेध करण्यासाठी 40 क्विंटल कांदा सदरील शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर फेकुन दिला तसेच पुरुषोत्तम ट्रेडिंग कंपनी या व्यापाऱ्यांने सदरील कांदा 270 रू दराने निलाव करून सुध्दा शेतकऱ्यांचा कांदा घेण्यात आला नाही व पावती देण्यात नकार दिला तसेच वैजापूर कुषी उत्पन्न बाजार समिती मध्ये
1 दररोजचे भाव फलक लावण्यात यावे.
2 कुषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बध पडलेला काटा चालु करण्यात यावे.
3 दररोज खरेदी केलेला मालाचा ग्रेड नुसार भाव फलक लावण्यात यावे.
4 निलाव झालेल्या मालाची रक्कम कॅश स्वरूपात देण्यात यावी.
5 निलावात एक भाव तर निलाव संपल्यानंतर वेगळाच मनमानी भाव देतात हा सर्व प्रकार उपसचिव मते याच्या आशीर्वादाने चालतो. या अधिकाऱ्यांची चौकशी करून निलंबित करण्यात यावे. या सर्व प्रकाराकडे तालुका प्रशासनाने 3 दिवसांच्या आत म्हणजेच सोमवार पर्यंत दखल न घेतल्यास जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अतुल भाऊ खुपसे पाटिल याच्या आदेशानुसार व जनशक्ती शेतकरी संघटनेचे संपर्क प्रमुख अनिल शेळके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेचे पदाधिकारी शेतकऱ्यांसह वैजापूर तालुक्यात कधी आणि कुठेही अनोखे गंभीर स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल. असे निवेदन देण्यात आले. यावेळी विजय पाटिल वाघ छ:संभाजीनगर जिल्हाप्रमुख संतोष पाटील सोनवणे युवा जिल्हाप्रमुख छ: संभाजीनगर रमेश गायकवाड उपजिल्हाप्रमुख वैजापूर नितीन पाटील बारसे तालुकाप्रमुख वैजापूर संतोष गर्जे तालुका कार्याध्यक्ष वैजापूर मनोज नळे ( नुकसानग्रस्त शेतकरी) मनोज वाकडे उपतालुकाप्रमुख वैजापूर बाळु जानराव
उपतालुका प्रमुख गणेश चाळक तालुका कार्यधक्ष वैजापूर कैलास सोनवणे सर्कल प्रमुख गारज व इतर पदाधिकाऱ्यांसह शेतकरी उपस्थित होते.