आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

खटाव:-वडूज नगरीतील पाण्याच्या प्रश्नाबाबत पंख्याखाली थंड हवेचा आस्वाद घेवून खुलासा करणे हास्य पद- मनोज कुंभार

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

वडूज नगरीतील पाण्याच्या प्रश्नाबाबत पंख्याखाली थंड हवेचा आस्वाद घेवून खुलासा करणे हास्य पद- मनोज कुंभार
वडुज दि:

पाणी हे जीवन आहे. हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. परंतु ज्या मतदारांनी मत देऊन आपल्याला नगराध्यक्ष पदाची सत्ता मिळवून दिली. त्या नागरिकांचा प्रश्न सोडवणे हे नैतिक जबाबदारी नगराध्यक्षाची असतानाही भर उन्हात बसलेल्या आंदोलकांना दिलासा देण्याऐवजी आलिशान घरात पंख्याखाली बसून खुलासा करणे हास्यास्पद आहे. आंदोलकांच्या दुःखावर मीठ चोळण्याचा प्रकार आहे अशा तिखट शब्दात वडूजचे उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांनी पत्रक काढून आपले मत दिले आहे.तसेच तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे.
पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्या नागरिकांना कार्यक्षम व सक्षम नगराध्यक्षांनी पाणी पुरवठा टँकर घेऊन आंदोलन स्थळी भेट दिली असती. परंतु, दुर्दैवाने लॉटरी पद्धतीने नगराध्यक्ष पद मिळालेल्या नगराध्यक्ष आदरणीय सौ. मनीषा काळे यांनी आपल्या घरी बसून पंख्याखाली थंड हवेचा आस्वाद घेऊन जो खुलासा केलेला आहे. तो खूप मोठा वेदनादायक आहे. राजकारणाचे पद्धतीने राजकारण होत असतेच परंतु, आपण एक महिला आहे .पोट तिडकेने महिला भर उन्हात बसले होत्या. काहींना उष्मघाताचा त्रास झाल्या तरी सुद्धा आपल्याला पाणी मिळेल. या आशेने पोटतिडकीने त्यांनी रास्ता रोको आंदोलन केले होते. आंदोलकांची भेट घेणे ऐवजी नगराध्यक्षांनी पंख्याखाली बसून थंड हवेचा आस्वाद घेत खुलासा पाठविला आहे. . याची आता इतिहासात नोंद होणार आहे.
सध्या तापमान वाढले असून लोकांना घराबाहेर पडणे अशक्य झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली आपणच काळजी घ्यावी. एकेकाळी हुतात्म्याची नगरी असलेल्या वडूज नगरीला कुणाची तरी दृष्ट लागल्यामुळेच असा प्रकार घडत आहे. देवाने त्यांना सुबुद्धी द्यावी अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.
या वेळेला नगरसेविका सौ. स्वप्नाली गोडसे व नगरसेविका श्रीमती शोभा बडेकर, सौ रोशना गोडसे, शोभा वायदंडे, सौ राधिका गोडसे, सौ आरती काळे , माजी नगराध्यक्ष सुनिल गोडसे, , पृथ्वीराज गोडसे, श्रीकांत काळे, इम्तियाज बागवान, गणेश गोडसे, रणजीत गोडसे व मान्यवर उपस्थित होते.
फोटो – मनोज कुंभार

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button