कराड:- वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे NDRF पथकाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड:-9923900840

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी प्रा.संतोष बोंगाळे कराड
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे NDRF पथकाकडून आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण.
कराड, (दि. 20 एप्रिल, 2023) श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर कराडच्या वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथील वरिष्ठ विभागातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) तसेच तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार,दि. 20 एप्रिल 2023 रोजी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, एन.डी.आर.एफ. पथकाचा आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कराड तालुक्यातील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे आपत्तीजन्य परिस्थितीकरिता सन 2023 मध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बचाव कार्य राबविणेच्या अनुषंगाने कराड तालुक्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, एन.डी.आर.एफ. पथकामार्फत 17 ते 20 एप्रिल या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आले. या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. बी. एस. तडवी, नायब तहसीलदार, तहसील तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय, कराड उपस्थित होते, तर या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री. दिलीप दादासाहेब चव्हाण (भाऊ),सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ, विद्यानगर, कराड यांनी भूषविले.
सुसंस्कृत व शिस्तप्रिय विद्यार्थ्यांमधूनच सामाजिकभान असणारे व सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श नागरिक निर्माण होतात आणि अशी आदर्श पिढीच भविष्यातील उज्वल भारत घडवू शकते. सर्वगुणसंपन्न, आत्मविश्वास असणारे विद्यार्थी घडविण्याकरता अशा प्रशिक्षणाची गरज आहे व महाविद्यालयाने आयोजित केलेला हा उपक्रम स्तुत्य आहे, असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. दिलीपभाऊ चव्हाण यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये व्यक्त केले.
श्री. कृष्णा मर्ढेकर, एन.डी.आर.एफ. पथकप्रमुख यांनी एन.डी.आर.एफ. म्हणजे काय, त्यांचे कामाचे स्वरूप, त्यांची कर्तव्य याची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत CPR ( कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन) म्हणजे काय? आपत्कालीन परिस्थितीमध्ये एखाद्या व्यक्तीचा श्वासोच्छ्वास किंवा हृदय थांबल्यास त्याचे प्राण कसे वाचवायचे, त्याचे पूर्ण प्रात्यक्षिक, तसेच घरगुती वस्तूंपासून स्ट्रेचर कसे बनवायचे व कोणकोणत्या प्रकारचे स्ट्रेचर असू शकतात, त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. आपत्ती ठिकाणी आपण कोणत्या गोष्टी कराव्यात आणि करू नये, धोका कसा ओळखायचा आणि त्याला कसे प्रत्युत्तर द्यायचे, लोकांना जीवन संजीवनी कशी द्यायची, आणि दुसऱ्याचा जीव आपातकालीन परिस्थितीमध्ये कसा वाचवायचा हे पूर्णपणे प्रात्यक्षिक स्वरूपात सादर करण्यात आले.
आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये घरगुती साहित्य जसे रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, तेलाचे कॅन, गाडीची ट्यूब, सुकलेले नारळ, इत्यादी साहित्याचा वापर कशाप्रकारे स्वतःचा व इतरांचा जीव वाचवण्यासाठी करता येतो याची माहिती प्रशिक्षण टीमने दिली. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सर्वांचे मुख्य आकर्षण म्हणजे पिंकी श्वान (Pinky Dog) होय. प्रशिक्षक श्री. अंशुमन शेखर आपण प्राण्यांचा वापर आपत्तीजन्य परिस्थितीमध्ये कसा करू शकतो हे पिंकी श्वानला दिलेल्या वेगवेगळ्या सूचनांच्या माध्यमातून सादर केले.
या कार्यक्रमासाठी श्रीकृष्ण मर्ढेकर, एन.डी.आर.एफ. पथक प्रमुख, मा.श्री. संजय रामराव पाटील, पोलीस पाटील, सैदापूर, मा. श्री. डी. व्ही. काळबांडे, तलाठी, सैदापूर, श्री शंकर लादे, श्री सुरज वाघमारे, नेहरू युवा केंद्र तालुकाप्रमुख, उपस्थित होते. एनडीआरएफ पथकातील राहुल कुमार, विद्याकांत त्रिपाठी, धनंजय कुमार, योगेश साबळे, सनोज यादव, अविनाश जाधव, अंशुमन शेखर, ढोली सखाहरी, दीपक सूर्यवंशी, विकास बर्गे, गणेश भालेराव, दीपक पाटील, यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले.उपस्थित मान्यवरांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. जी. जाधव यांनी केले. प्रमुख पाहुणे व अध्यक्ष यांचा परिचय प्रा. सौ. एस. पी. पाटील यांनी करून दिला तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. अल्फिया मुल्ला यांनी केल. आभार प्रा. आर.पी. पवार यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक, राष्ट्रीय छात्र सेनेतील छात्रसैनिक, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.