ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मायणी :-स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी संपन्न.

प्रतिनिधी प्रा. दिलीप पुस्तके सातारा:-9890318605

मायणी :-स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी संपन्न___मायणी प्रतिनिधी___ खटाव तालुक्याचे भाग्यविधाते व उरमोडीचे जनक स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांची सातवी पुण्यतिथी विविध उपक्रमांनी व भावपूर्ण वातावरणात संपन्न झाली प्रारंभी मायणी येथील ग्रामपंचायत कार्यालयातील भाऊसाहेब गुदगे यांच्या प्रतिमेला युवा नेते सचिन गुदगे व माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यानंतर भारत माता विद्यालयातील स्वर्गीय भाऊसाहेब गुदगे यांच्या समाधीला पुष्पचक्र युवा नेते सचिन गुदगे व डॉक्टर दिलीपराव या गावकर यांच्या हस्ते वाहून आदरांजली वाहिली त्यानंतर चांदणी चौकात 15 व्या वित्त आयोगातून तयार करण्यात आलेल्या वॉटर एटीएम या शुद्ध पाण्याच्या शुभारंभ सचिन गुदगे यांच्या हस्ते डॉक्टर दिलीपराव यळगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला यावेळी बोलताना सचिन गुदगे म्हणाले की भाऊसाहेबांनी एक स्वप्न पाहिले होते मायणी येथील महिलांच्या डोक्यावरची घागर मी खाली उतरवणार व या जनतेला शुद्ध व मुबलक पाणी देणार आज त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण केले आहे विरोधक म्हणतात विकासाची गंगा जनतेच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवली पण तुम्ही तुमच्या काळात विकास गंगेची गटारगंगा केली होती आम्ही ही गंगावता स्वच्छ निर्मळ पारदर्शक केली आहे चार दोन लाखाचे काम आणायचे वर्धनगड ते तरसवाडी डोंगरा पिठाचा हे आम्हाला पटत नाही टेंभू योजनेसारखी कोट्यावधी रुपयाची शाश्वत विकासाची कामे आम्ही आणले आहेत यापुढेही आम्ही विकासात कधीही कमी पडणार नाही डॉक्टर दिलीपराव्या गावकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की ग्रामपंचायतने पारदर्शक कारभार केला आहे गेल्या वीस वर्षातील बिघडलेला समतोल सावरलेला आहे विरोधकांनी आमच्या विकासात खो घालण्याचे काम केले आहे पण आम्ही त्याला घाबरणार नाही आम्ही जशास तसे उत्तर देण्यास तयार आहोत शाश्वत विकासाच्या जोरावर आम्ही आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी जनतेसमोर जाणारच आहोत या जगात कोणीही ताम्रपट घेऊन आला नाही आता जनता तुम्हाला कंटाळली आहे त्याचे उत्तर आगामी निवडणुकीतच कळेल या कार्यक्रमास ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य उपसरपंच जगन्नाथ भिसे सुदाम भिसे गणीभाई मुल्ला जालिंदर माळी दिलावर मुल्ला माजी शिक्षणाधिकारी राजकुमार चव्हाण माजी सरपंच महादेव येलमर पांडुरंग झगडे पिंटू झोडगे कुमार शेठ देशमुख मोहन दगडे मधुकर कचरे विलास सोमदे पिंटू सोमदे पिंटू झोडगे अनिल सुगदरे असे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते शेवटी राजू कचरे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button