बारामती:-बारामती येथे शनिवारी 22 रोजी ज्योतिष प्रसार दिंडी व संमेलनाचे आयोजन.
प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा:9890318605

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी ज्येष्ठ पत्रकार दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख.
बारामती येथे शनिवारी 22 रोजी ज्योतिष प्रसार दिंडी व संमेलनाचे आयोजन.
मायणी प्रतिनिधी__बृहन महाराष्ट्र ज्योतिष मंडळ संचालित 93 वी ज्योतिष प्रसार दिंडी व विभागीय ज्योती संमेलन दिनांक 22 रोजी शनिवारी व 23 रोजी रविवारी आयोजन केले असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर जकातदार यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की या दोन दिवशीय अधिवेशनात ज्योतिष शास्त्राचा प्रचार प्रसार हा प्रमुख उद्देश असून संमेलनाच्या माध्यमातून ज्योतिष तज्ञाची व्याख्याने संकल्पना विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी हे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीचे व संमेलनाचे उद्घाटन प्रतिभा शाहू मोडक यांच्या शुभहस्ते तर अध्यक्ष म्हणून सातारचे प्राचार्य रमणलाल शहा उपस्थित राहणार आहे. तसेच बारामतीच्या माजी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन शेठ सातव किरण दादा गुजरअध्यक्ष नटराज नाट्य मंडळ श्री विजय जकातदार श्री विजयकुमार डेंगळे तसेच डॉक्टर प्रदीप जाधव यांची प्रमुख उपस्थिती आहे दुसऱ्या सत्रात गौरी केंजळे –मोबाईल न्यूरोलॉजी मेघ शाम पाठक –अंकशास्त्र चंद्रकांत __वाघुळ दे _सामाजिक सामुद्रिक शास्त्र या व्यासपीठाचे अध्यक्ष ज्योती जोशी आहेत तिसऱ्या सत्रात एडवोकेट मालती शर्मा यांचे वैवाहिक जीवन या विषयावर व्याख्यान होणार आहेचौथ्या सत्रात प्रतिभा पार गुंडे— संतती योग गौतम ब्रम्हे _&शिक्षण योग अवंतिका गाढवे –परदेश गमन योग गौरी पोळ –नोकरी व्यवसाय दिनांक रविवार 23 रोजी पहिल्या सत्रात प्रदीप जाधव __विद्या आराधण्याचे महत्त्व मंजुषा जगताप __ज्योतिष शास्त्र वास्तुशास्त्र समन्वय प्रिया मालवणकर– उपासनेने प्रारब्ध बदलता येते का दुसरे सत्र अध्यक्ष ज्ञानगंगा फाउंडेशन कोल्हापूर प्राध्यापक दिलीप पुस्तके –ज्योतिष शास्त्राची सामाजिक गरज भरत डुंबरे -रोलिंग प्लॅनेट प्रसाद डावरे अंकशास्त्र संध्या मारणे _घराचा योग सत्र तिसरे नंदकिशोर जकातदार कुलपती वराह मिहीर मुक्त विद्यापीठ यांचे गोचरीने भविष्य कसे घडवावे ?या विषयावर व्याख्यान होणार आहे.
तसेच ज्योतिष शास्त्रात बहुमोल कार्य करणाऱ्या ज्योतिर्विदांचा सत्कार करण्यात येणार आहे या सत्कार समारंभास झी टीव्ही फेम माननीय अतुल शास्त्री भगरे गुरुजी माननीय आनंदकुमार कुलकर्णी कुलगुरू वराहमरीह संस्था माननीय सुरेश शेठ जाधव माजी नगरसेवक बारामती माननीय डॉक्टर प्रदीप जाधव माननीय विजयकुमार डेंगळे उपस्थित राहणार आहेत तरी ज्योतिष प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन नंदकिशोर जकातदार यांनी केले आहे.