कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-वडुज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीशिवाय पर्याय राहिलेला नाही – प्रभाकर घार्गे

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

वडुज कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीशिवाय पर्याय राहिलेला नाही – प्रभाकर घार्गे

दि:वडुज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक बिनविरोध व्हावी असे आवाहन केले पण, अर्ज माघारी घेण्यासाठी नाराजीचे सूर बदलला. त्यामुळे निवडणुकी शिवाय पर्याय राहिला नाही. असे माजी आ. प्रभाकर घार्गे यांनी सांगितले की,
खटाव तालुक्यातील वडुज येथे भाजीपाला, पुसेगाव येथे कांदा, व पूसेसावली भुसार व्यवसाय निमित्त वडूज, पुसेगाव, पुसेसावळी बाजार जोमाने सुरू करण्याचा प्रयत्न करणार आहे.सदरची बाजार समिती तीन वर्षात सुरळीत होती ती आर्थिक अडचणीत आली आहे. त्यामुळे खटाव तालुक्यात सहकार वाढीसाठी प्रयत्नशील आहे. खटाव तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सुस्थिती आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.१९७२ केशवराव पाटील, संभाजी राव घाडगे, ध्येयशील देशमुख यांनी वडूज येथे सात एकर, पुसेसावळी येथे पाच एकर व उप बाजार समिती स्थापन केली होती. त्यानंतर, एक गुंठा जागा घेता आली नाही. ही खंत आहे.
कराडला भाजीपाला जातो तो पुन्हा खटाव तालुक्यात येतो. आता बाजार समितीत इंद्र धनुष्य उचलले आहे. पक्षीय मतभेद न ठेवता सर्वजण माजी आ. प्रभाकर घार्गे यांच्या नेतृ्वाखालील एकत्र आले. यावेळी रणजीत देशमुख, ध्येयशील कदम, डॉ. सुरेश जाधव, धनजंय चव्हाण, राहुल पाटील, रणजीत जाधव, अशोक कुदळे, डॉ दिलीप येळगावकर, डॉ महेश गुरव, नवल थोरात, राजू भैय्या मुलाणी, अमरजित कांबळे, विजयकुमार शिंदे, अशोक गोडसे यांना ही भूमिका मान्य असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

सामान्य व नवीन चेहरे संधी दिली आहे, या गटातील ६५ सक्षम उमेदवारांनी माघारी घेतली, सहकार वाढीसाठी २५ वर्ष अनुभव आहे. विजयाची कोणती ही अडचणी वाटत नाही. कर्ज मुक्त बाजार समिती करण्यात येईल. कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाईल.
शेतकरी संघटनेला आवाहन केले होते. सर्व मतदार खटाव विकास आघाडी सोबत राहणार आहे. राजकीय जोडे बाहेर आहेत. सहकार वाढला पाहिजे. बाजार पेठ निर्माण करणे. शेळी मेंढी, जनावरांचा बाजार चांगल्या पद्धतीने पार पाडणे हाच उदिष्ट असल्याचे ही सागितले.छोट्या गावांना संधी देण्याची भूमिका घेतली आहे असे ही पत्रकार परिषदेत सांगून विजयाची चाहूल लागली आहे असे स्पष्ट केले.
—————————————————————
फोटो – कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक निर्णय बाबत भूमिका मांडताना नेते प्रभाकर घार्गे (छाया – सूरज पोतदार, वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button