ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

फलटण:-मौजे जाधववाडी गळ्यातील गंठण हिसकावून चोरट्याचा धूम स्टाईलनी पोबारा.

प्रतिनिधी शुभम भापकर फलटण :-7972521412

फलटण प्रतिनिधी शुभम भापकर
मौजे जाधववाडी (फ) तालुका फलटण गावच्या हद्दीत अज्ञात चोरट्यांने दुचाकीवरून येऊन पाठीमागून सुमारे ४५ हजार रुपये किंमतीचा सोन्याचा मिनी गंठण तोडून घेऊन गेली असल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवार दिनांक ६ ऑगस्ट रोजी सौ.सुलभा उदयराज माने (वय ४८ रा. गणेशनगर साई मंदिरनजीक जाधववाडी ता.फलटण,जि.सातारा) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेवन करून फिर्यादी व त्यांचे पती उदयराज हे दोघे साईमंदिर जाधववाडी येथे फलटण गिरवीरोडने शतपावली करीत होते.

तेव्हा 10.15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती रोडने शतपावली करून गिरवी-फलटण रोडने घराकडे येत असताना रोडच्या बाजुस उभे असलेल्या दुचाकी गाडीवर दोघे अनोळखी व्यक्ती साधारण 20 ते 25 वयोगटातील यांना क्रॉस करून फिर्यादी व त्यांचे पती पुढे निघाले असताना.

त्यावेळी अचानक फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचा मिनीगठण पाठीमागुन कोणीतरी ओढला व तोडला म्हणुन फिर्यादी जोरात ओरडले असता त्यांचे पती उदयराज यांनी माझे पाठीमागे पाहिले असता एक अनोळखी व्यक्ती कानटोपी घातलेला व तोंड बांधलेला फिर्यादी यांना दिसला.

फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचा गंठण तोडुन पळून जाताना पाहिला म्हणुन पती उदयराज यांनी त्याचा पाठलाग करून लगेच पकडले त्यावेळी अनोळखी व्यक्ती व पती उदयराज यांच्यात झटापट झाली. त्यावेळी पती उदयराज यांच्या हातात अनोळखी चोरट्याची कानटोपी आली व अनोळखी चोरटा तेथुन उदयराज यांना धक्का देवून फलटण बाजुकडे पळत जावून पुढे थांबलेल्या दुचाकी गाडीवर थांबलेल्या त्याच्या साथीदार सह तेथून फलटण बाजुकडे गाडीवरुन पळून गेले.

त्यावेळी उदयराज हे त्यांच्या मागे पळू लागले म्हणुन फिर्यादी सुद्धा मागे पळू लागले. त्यावेळी फिर्यादी यांच्या चप्पलचा बंद निघुन फिर्यादी खाली पडले म्हणुन उदयराज हे पुढे न जाता त्यांनी फिर्यादी यांना येवुन उठविले. त्यानंतर फिर्यादी तेथे चोर चोर म्हणुन खुप ओरडले परंतु रस्त्याला कोणी नसलेने कोणी मदतीला आले नाही. त्यानंतर फिर्यादी व उदयराज यांनी तेथे रोडवर मोबाईलचे दाने तेथे आजुबाजुला पाहाणी केली असता फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गठणचा एक छोटासा तुकडा त्यांना मिळुन आला.

अशी फिर्यादी फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे अधिक तपास फलटण शहर पोलीस करीत आहेत.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button