खटाव:-संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी चोराडे येथे उत्साहात साजरी : धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महा प्रसादाचे आयोजन.
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव
संत गोरोबाकाका यांची पुण्यतिथी चोराडे येथे उत्साहात साजरी : धार्मिक कार्यक्रमांबरोबरच महा प्रसादाचे आयोजन.
पुसेसावळी : संत शिरोमणी गोरोबाकाका कुंभार यांची ७०६ वी पुण्यतिथी सोहळा भक्तीमय व उत्साहाच्या वातावरणात संपन्न चोराडे येथे झाला.आज मंगळवारी कुंभार समाजाचे आराध्य दैवत श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पुण्यतिथीचा सोहळा बाळकृष्ण महादेव कुंभार यांच्या घरी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला, या पुण्यतिथी निमित्त भजन,आरती या सर्व धार्मिक कार्यक्रमात बरोबर महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी ह.भ.प. प्रकाश लोकरे,भगवान पिसाळ,श्रीरंग पिसाळ, दादासो दगडे, संजय कुंभार,उदय बामणे, राजाराम पिसाळ,नितीन कुलकर्णी, सुनील कोळी, राजू पिसाळ, संभाजी कुंभार,आबासो काशीद,विनोद कुंभार, आबासाहेब साळुंखे,सचिन पिसाळ, उमेश पिसाळ, भास्कर पिसाळ,मधुकर पाटील, सोमनाथ बामणे, कुमार क्षीरसागर,बाळू पाटील, कुंभार समाज बांधव व चोराडे ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो :
संत गोरोबाकाका कुंभार यांच्या ७०६
व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त चोराडे
येथे आरतीस ग्रामस्थ महिलावर्ग उपस्थित होते.