क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-चटकदार कुस्त्या : निकाली कुस्त्यांनी डोळ्याचे पारणे फिटले.

प्रतिनिधी-अनमोल गुरव खटाव:-9881355582

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अनमोल गुरव खटाव

चटकदार कुस्त्या : निकाली कुस्त्यांनी डोळ्याचे पारणे फिटले.

चोराडे मधील कुस्ती मैदानात पै.वैभव रासकरने पै.विक्रांत दहीयाला बाहेरून आकडी डावावर केले चितपट

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील चोराडे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या मैदानात निकाली कुस्त्या पार पडल्या. कुस्ती मल्लाकडून विजयासाठी केलेल्या डाव-प्रतिडावाने उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्याचे पारणे फिटले. ग्रामदैवत श्री.भैरवनाथा च्या यात्रेनिमित्त यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने निकालीकुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन केले होते.

श्रीफळापासून दीड लाखाच्या इनामापर्यंत नियोजनाप्रमाणे निकाली कुस्त्या पार पडल्या. यामध्ये एक नंबरच्या दीड लाख इनामाच्या कुस्तीमध्ये कडेगावचा पैलवान वैभव रासकरने हरियाणाचा पैलवान विक्रांत दहीयाला बाहेरून आकडी डावावर चितपट करून विजय मिळवला. तर दोन नंबरच्या एक लाख इनामाच्या कुस्तीमध्ये दिल्लीच्या राकेश कुमारला लपेट डावावर पैलवान वैभव रासकरने आस्मान दाखवले, तर तीन नंबरच्या पंच्याहत्तर हजार इनाम कुस्तीमध्ये पैलवान दशरथ तामखडे विरुद्ध पैलवान सागर सावंत या कुस्तीमध्ये पैलवान दशरथ तामखडे विजय झाला.
तर पैलवान इम्रान मुजावर, पैलवान भारत पवार, पैलवान प्रतीक निकम,पैलवान वैभव लोकरे यांनी नेत्रदीपक कुस्ती करत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळवली.छोट्या मोठ्या चटकदार कुस्त्यांनी चोराडेचे मैदान चांगलेच गाजले, तर कुस्त्यांचे धावते समालोचन गणेश देशमुख (चोराडे) यांनी करून कुस्तीत जिवंतपणा आणून मैदानात चांगलीच रंगत आणली,चोराडे येथील श्री भैरवनाथ यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानाने चोराडे व परिसरातील प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.तरी यात्रा कमिटी
व ग्रामस्थांच्या वतीने या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती मैदानास चोराडेसह परिसरातील कुस्ती शौकीन व कुस्तीगिरांनी हजेरी लावली होती.

 

फोटो ओळ :

चोराडे येथील कुस्ती मैदानात विजयी पैलवान वैभव रासकरला विजयी गदा देताना बापूराव पिसाळ,सुनील पिसाळ अक्षय घाडगे, शंकर पिसाळ आदी…

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button