आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

खटाव:-हुतात्म्याच्या नगरीत शहीद मयूर यादव यांना शोकाकुल वातावरणात अखेरची सलामी,,

प्रतिनिधी अजित जगताप सातारा:-9922241299

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

प्रतिनिधी अजित जगताप सातारा

हुतात्म्याच्या नगरीत शहीद मयूर यादव यांना शोकाकुल वातावरणात अखेरची सलामी,,

वडूज दि:

अंबाला येथील सेना दलाच्या छावणीत पंजाब या ठिकाणी शहीद मयूर यादव यांच्या मृत्यूची बातमी समजतात संपूर्ण सातारा जिल्ह्यात शोककळा पसरली होती. गेली दोन दिवस चातकाप्रमाणे सर्वजण पार्थिवाची वाट पाहत होते. आज दुपारी पुणे येथून पार्थिव वडूज नगरीत आल्यानंतर अनेकांना हुंदका आवरता आला नाही. आपल्या लाडक्या मयूर यादव चे पार्थिव पाहून त्याची आई सौ. मंगल व वडिल जयंत यादव व मयूर यादवची पत्नी सौ राधिका यादव तसेच नातेवाईकांनी हंबरडा फोडला.
यावेळी सर्वांचे मन हेलावून गेले होते. शून्याकडे नजर लावून बसलेली तीन वर्षाची चिमुकली कुमारी अद्विता हिच्या चेहऱ्याकडे पाहून अनेकांचे डोळे पाणावले होते.या वेळेला खटाव तालुक्यातील राजकीय नेते गणांसोबत खटाव तहसीलदार किरण जमदाडे , स पो नि अक्षय सोनवणे, जिल्हा सैनिक कार्यालयाचे आर एन जाधव, संदीप लगड, उत्तम कर्वे, बबन धुमाळ, पी एम कुलकर्णी ,देविदास भिसे, जय हिंद फाउंडेशन तसेच पत्रकार संघटना व मान्यवरांनी अखेरचे पुष्पचक्र अर्पण करून शहीद मयूर यादव यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळेला बाल चिमुकलीचा निरागस चेहऱ्याकडे पाहून अनेकांना आपले अश्रू आवरता आले नाही.
वडूज व आजूबाजूच्या परिसरातील नातेवाईक मित्रपरिवार व देशावर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी स्वयंपूर्ण वडूज नगरीतील सर्व व्यवहार बंद पाडून शहीद मयूर यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. काहींनी जागोजागी विनम्र अभिवादन अभिवादनाचे फलक लावले. सकाळी पासून वडूज येथील वातावरण अत्यंत शोकाकुल बनले होते. प्रारंभी सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये अंत्यविधी होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु, वडूज नगरीतील सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वडूज डेपोच्या अधिकाऱ्यांनी समय सूचकता दाखवून वडूज डेपोच्या जागेमध्ये अंत्यविधी करण्याचे निश्चित केले. त्यानंतर वडूज नगरीमध्ये पार्थिवाची भव्य यात्रा काढून सर्वांनी पुष्प टाकून शहीद मयूर यादव याचे अभिवादन केले.
या वेळेला मोठ्या संख्येने सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहिले होते. सजवलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली मधून शहीद मयूर यादव अमर रहे च्या घोषणा देत वंदे मातरम च्याही घोषणा दिल्या. भारत माता की जय असा जयघोष करत ही यात्रा शांततापूर्णरित्या संपूर्ण वडूज नगरीतून आल्यानंतर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस दल व कुटुंबीयांनी आपल्या शाहिद मयूर यादव याला अखेरची मानवंदना दिली. पोलीस यंत्रणेच्या वतीने बंदुकीच्या फैरी झाडल्या होत्या. वडूज पत्रकार संघाचे पदाधिकारी व मान्यवर राजकीय नेत्यांसोबतच अनेकांनी खूप मोठी गर्दी केल्यामुळे उपस्थित जनसमुदायाला वारंवार सूचना करण्यात आल्या होत्या.
या दुःखद प्रसंगी अनेकांनी आपल्या लाडक्या मयूर यादवची आठवण काढून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांच्या नातेवाईक मित्रपरिवारांना झालेले दुःख हे न विसरता येण्यासारखे आहे. मान्यवर कार्यकर्त्यांनी एक सामाजिक जाणीव ठेवून संपूर्ण सहकार्य केल्यामुळे हा अंत्यविधी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पडला. उद्या सकाळी वडूज एस टी डेपो च्या जागेतच
सावडण्याचविधी होणार असल्याची माहिती या वेळेला सामाजिक कार्यकर्ते यांनी दिली. या शहीद मयूर यादव यांच्या या दुःखद घटनेमुळे सर्व नातेवाईक व मित्र परिवारांना दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी अनेकांनी प्रार्थना करून दोन मिनिटं स्तब्ध राहून शहीद यादव यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, अंकुश गोरे, सुरेंद्र गुद गे,प्रा. बंडा गोडसे, संदीप मांडवे, नंदकुमार गोडसे, सौ मनीष काळे, मनोज कुंभार, मोहन देशमुख, गोविंद भंडारे, महेश गोडसे, शेखर जाधव, जय हिंद फाउंडेशन व इतर संघटनेने पुष्पचक्र अर्पण केले. विजयकुमार शिंदे, प्रसाद जगदाळे, राजेंद्र जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले.
————–&———————————————

 

फोटो -वडूज नगरीतील शहीद मयूर यादव यांचे शोकाकुल नातेवाईक व इतर छायाचित्र (छाया- सुरज पोतदार ,वडूज)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button